शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पावसात धान पीक उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 05:00 IST

बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवला आहे. दुपारी अचानक आलेल्या या पावसाने संपूर्ण धान पीक आडवे झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात सर्वदूर पाऊस : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा केला घात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने बुधवारी दुपारी जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावून कापणीला आलेले धान पीक उद्ध्वस्त केले. वादळी वाऱ्यासह बरसलेल्या या पावसाने शेकडो हेक्टरवरील पीक भुईसपाट झाले आहे. तर कापलेले कडपे ओले झाले आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा या पावसाने घात केला.बुधवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. तब्बल दोन तास बरसलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका धान पिकाला बसला आहे. सध्या जिल्ह्यात धान काढणीला आला असून काही शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून कडपा बांधून ठेवला आहे. दुपारी अचानक आलेल्या या पावसाने संपूर्ण धान पीक आडवे झाल्याचे चित्र शेतशिवारात दिसत आहे.लाखनी तालुक्याला या पावसाचा जोरदार फटका बसला. पालांदूर, खराशी, खुनारी, डोंगरगाव, मुरमाडी, जेवनाळा, मचारणा, कवलेवाडा, मेंगापूर आदीसह अनेक गावात जोरदार पाऊस कोसळला. पवनी तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. हस्ती नक्षत्राचा पाऊस बरसल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. उभे पीक आडवे झाले असून कडपा ओल्या झाल्या आहे. सर्वाधिक फटका चौरास भागातील आसगाव परिसराला बसला आहे.तुमसर तालुक्यात दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने धानाच्या कडपा ओल्या झाल्या. सायंकाळीसुद्धा पाऊस बरसत होता. तालुक्यातील पवनारा, सिहोरा, चुल्हाड यासह अनेक गावांना या पावसाचा फटका बसला.मोहाडी तालुक्यात सायंकाळी ४ वाजतापासून पावसाला सुरूवात झाली. या पावसाने शेतकरी उद्ध्वस्त झालेत. लाखांदूर आणि साकोली तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.कापणी झालेला धान वाचविण्याची धडपडजिल्ह्यात हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू झाली आहे. गत तीन चार दिवसांपासून कापणीला वेग आला. मात्र बुधवारी दुपारी अचानक जोरदार पाऊस बरसला. यामुळे शेतात कापूण ठेवलेल्या धानाच्या कडपा ओल्या झाल्या. कडपा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी धडपड चालविल्याचे चित्र दिसत होते. मात्र पाऊस जोरदार असल्याने कडपा वाचविण्याची उसंतही शेतकऱ्यांना मिळाली नाही.शेतकऱ्यांवर संकटाची मालिकाधान उत्पादक शेतकऱ्यांवर यंदा संकटाची मालिका दिसत आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारल्याने धान पीक धोक्यात आले होते. शेतकऱ्यांनी यासंकटावर मात केली तर आॅगस्ट महिन्यात झालेल्या महापुराचा शेकडो हेक्टर धान पिकाला फटका बसला. यातून सावरत नाही तोच आता बुधवारी परतीच्या पावसाने शेतकºयांच्या हातचा घास हिसकावून नेला.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस