मॉक ड्रिलमधून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तयारीचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:00 AM2020-04-05T05:00:00+5:302020-04-05T05:01:00+5:30

तेथील डॉक्टर अशावेळी काय करतात याची पाहणी केली. त्यानंतर या रुग्णाला आयसोलेशन वॉर्डात नेण्यात आले. तेथे त्याच्या घशातील स्वॅपचे नमुने डॉ.किरण कानेरे यांनी घेतले. ते नागपुरला कसे पाठविले जातात याचेही प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर सदर डमी रुग्णाला व्हॅटीलेटर कसे लावायचे याचे प्रात्यक्षिक डॉ.रुपेश थोटे यांनी करून दाखविले. मॉक ड्रिलमध्ये आरोग्य यंत्रणा अगदी सज्ज असल्याचे दिसून आले.

Overview of District General Hospital Preparation from Mock Drill | मॉक ड्रिलमधून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तयारीचा आढावा

मॉक ड्रिलमधून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या तयारीचा आढावा

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती । रुग्णवाहिकेपासून सॅम्पल आणि व्हॅटिलेटरचे प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज असली तरी ऐन वेळेवर एखादा कोरोनाबाधीत रुग्ण दाखल झाला तर रुग्णालयाची कशीतयारी आहे याचा आढावा जिल्हा प्रशासनाने शनिवारी मॉक ड्रिलच्या माध्यमातून घेतला. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मॉक ड्रिलमध्ये रुग्णवाहिकेपासून तर व्हॅटीलेटर पर्यंतचे प्रात्यक्षिक घेऊन तयारीचा आढावा घेतला.
भंडारा जिल्ह्यात अद्याप एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नाही. परंतु वैद्यकीय यंत्रणा सज्ज आहे. जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष, आयसोलेशन वॉर्ड तयार आहे. मात्र ऐनवेळी एखादा कोरोनाचा रुग्ण आला तर वैद्यकीय यंत्रणा कसा प्रतिसाद देते याची पाहणी शनिवारी जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी मॉक ड्रिलच्या माध्यमातून केली. या मॉक ड्रिलमध्ये दोन अ‍ॅम्बुलन्स सहभागी झाल्या होत्या. अ‍ॅम्बुलन्समधून आणलेला डमी रुग्ण थेट विलगीकरण कक्षात नेण्यात आला.
तेथील डॉक्टर अशावेळी काय करतात याची पाहणी केली. त्यानंतर या रुग्णाला आयसोलेशन वॉर्डात नेण्यात आले. तेथे त्याच्या घशातील स्वॅपचे नमुने डॉ.किरण कानेरे यांनी घेतले. ते नागपुरला कसे पाठविले जातात याचेही प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर सदर डमी रुग्णाला व्हॅटीलेटर कसे लावायचे याचे प्रात्यक्षिक डॉ.रुपेश थोटे यांनी करून दाखविले. मॉक ड्रिलमध्ये आरोग्य यंत्रणा अगदी सज्ज असल्याचे दिसून आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.जे. प्रदीपचंद्रन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस., जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, डॉ.सुनिता बढे, नोडल आॅफीसर पियुष जक्कल उपस्थित होते. मॉक ड्रिलमध्ये दोन अ‍ॅम्बुलन्स सह दहा डॉक्टरांचे पथकही सहभागी झाले होते. रुग्णालय सुसज्ज असल्याचे मॉकड्रिलमध्ये आढळून आले.
जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन यांनी यावेळी रुग्णालयाची पाहणी केली. तेथे किरकोळ दुरुस्तीचे कामे तात्काळ करण्याचे निर्देश बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता दिनेश नंदनवार यांना देण्यात आले. तसेच वीज व्यवस्था आणि फायर फायटिंगची व्यवस्था तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले.

जिल्ह्यातील ३० व्यक्तींचे नमुने निगेटीव्ह
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आयसोलेशन वॉर्डआणि विलगीकरण कक्षात दाखल व्यक्तीच्या पाठविलेल्या घशातील स्वॅपच्या नमुन्यांपैकी ३० जणांचे नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही करोनाबाधीत रुग्ण आढळला नसून प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. सध्या विलगीकरण कक्षात ३५ आणि आयसोलेशन वॉर्डात सात जण दाखल आहेत. येथील नर्सिंग वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षात ३५ जण दाखल असून आतापर्यंत तेथून २२ जणांना सुटी देण्यात आली आहे. आयसोलेशन वॉर्डात सात जण उपचार घेत आहेत.

Web Title: Overview of District General Hospital Preparation from Mock Drill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.