जिल्ह्यात मधुमेहाचे ३५ हजारांवर रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:00 AM2020-11-14T05:00:00+5:302020-11-14T05:00:20+5:30

फास्ट लाईफ व अनियंत्रित जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे. जगात भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास अलिकडच्या काळात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Over 35,000 diabetic patients in the district | जिल्ह्यात मधुमेहाचे ३५ हजारांवर रुग्ण

जिल्ह्यात मधुमेहाचे ३५ हजारांवर रुग्ण

Next
ठळक मुद्देआज जागतिक मधुमेह दिन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
अनियंत्रित जीवन शैली आणि विविध कारणांनी भंडारा जिल्ह्यात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात ३५ हजार ७३९ मधुमेहाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यात सर्वाधिक ११ हजार ३४५ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. 
फास्ट लाईफ व अनियंत्रित जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे. जगात भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास अलिकडच्या काळात मधुमेह रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. भंडारा तालुक्यात ११ हजार ३४५, साकोली ४६९१, लाखनी ४११९, मोहाडी १९३६, तुमसर ४५५१, पवनी ४५५० आणि लाखांदूर तालुक्यात ४१४३ रुग्णांची नोंद करण्यात आली. 
असंसर्गजन्य रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत रुग्णांची तपासणी करताना जिल्ह्यात ३५ हजार ७३९ रुग्ण आढळून आले आहेत. शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण अतिरिक्त वाढणे याला मधूमेह म्हणता येईल. अग्न्याशय नावाची ग्रंथी असते. ती इंन्सुलीन नावाचे एन्झाईम निर्माण करते. 
शारीरिक उर्जा निर्माण करण्यासाठी आपण जे काही ग्रहण करतो त्याचे रूपांतर शेवटी शर्करेत होते. त्यामुळे शरीराचे पोषण होते. परंतु शारीरिक अडचणीमुळे इंन्सुलीन स्त्रावनाचे प्रमाण कमी होते आणि रक्ततातील साखरेचे प्रमाण कमी होते, यालाच मधुमेह म्हणतात.
अशी घ्या काळजी
n मधुमेहाचे निदान झाल्यानंतर दररोज ४५ मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. वेळेवर जेवण, जेवणात हिरव्या पालेभाज्या, कळधान्य आवश्यक आहे. तेलकट, तुपकट, हवाबंद खाद्यपदार्थ आणि मासाहार खाणे टाळावे, वजन वाढू देवू नये, तंबाखूजन्य पदार्थाचे सेवक करू नये. रक्ततात साखरेचे प्रमाण साधारण १४० पेक्षा कमी असायला हवे. उपाशीपोटी १२६ पेक्षा कमी व जेवणानंतर २०० पेक्षा कमी असायला हवे.

Web Title: Over 35,000 diabetic patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.