शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

खुटसावरीत गॅस्ट्रोचा प्रकोप

By admin | Updated: July 2, 2016 00:28 IST

तालुक्यातील खुटसावरी येथील अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

१२ जण रुग्णालयात दाखल: आरोग्य विभागाचे पथक तैनातभंडारा : तालुक्यातील खुटसावरी येथील अनेकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. १२ रुग्ण लाखनी येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. याविषयी आरोग्य विभागाला कळताच भंडारा व धारगाव येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट दिली असून गावातील अंगणवाडीत आरोग्य शिबिराचे पथक तैनात झाले आहेत. सध्यस्थितीत परिस्थती धोक्यात बाहेर आहे.रुग्णांमध्ये सुनिता गजीराम गिऱ्हेपुंजे (४०), रंजना सुधाकर वघारे (३२), रुखमा गोकुळ मांढरे (६५), प्रमिला रेवाराम बडगे (३४), मोहन दयाराम गायधने (४०), विजू उत्तम मडावी (३५), सारजा कवळू बडगे (६५), अरविंद मस्के, दिनेश शेंडे, नंदा विलास भुते, योगीता किरपान, योगराज किरपान यांच्यासह जवळपास २१ जणांचा समावेश आहे.खुटसावरी येथे गत दोन दिवसांपासून गांधी वॉर्डातील चार ते पाच जणांना शौचासह उलटी होत होती. त्यानंतर हाच प्रकार अनेकांसोबत घडला. अनेकांनी ग्रामीण रुग्णालय, धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व खासगी दवाखान्यांकडे धाव घेतली. गावात अतिसाराची लागण दिसताच याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली. त्यानंतर काल, गुरुवारी सायंकाळी भंडारा व धारगाव येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थतीचे अवलोकन केले. रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता दिसताच अंगणावाडी केंद्रात आरोग्य शिबिर लावण्यात आले. आज सकाळपासून शिबिरात अनेक बाधीतांनी उपचार घेतला. रुग्ण शोध मोहिम राबविण्यात आली. पाण्याचे व ब्लिचिंगचे नमूने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. रुग्णसेवेसाठी धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी आर.डी. खंडाईत, डॉ. कापगते, डॉ. ठमके, नान्हे, डॉ.डी.पी. चिमणे, बी.झेड.बोंदरे, व्हि.बी. वलधरे, दिक्षा शेंडे, ए.एम. पडोळे हजेर होते. (नगर प्रतिनिधी)