शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

मुलाला थापड मारल्याचा संताप अनावर, डोक्यावर राॅड मारून शेजाऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 15:26 IST

वाचवायला गेलेले दोघे मायलेकही जखमी : राणी लक्ष्मीबाई वॉर्डातील थरार

भंडारा : आपल्या लहानग्या ५ वर्षे वयाच्या मुलाला शेजाऱ्याने गालावर थापड मारली. यामुळे संताप अनावर झालेल्या वडिलाने चक्क डोक्यावर रॉडने प्रहार करून शेजाऱ्याचा खून केला. एवढेच नाही तर या मारहाणीत मध्यस्ती करायला आलेल्या त्या शेजाऱ्याच्या पत्नीला आणि मुलालाही गंभीर जखमी केले. हा थरार गुरुवारी सायंकाळी ६:१५ वाजेच्या सुमारास खांबतलाव परिसरातील राणी लक्ष्मीबाई वॉर्डात घडला.

शालिकराम सहारे (६०) असे मृताचे नाव आहे, तर हल्लेखोराचे नाव अक्षय शाहू (२५) असे आहे. जखमी झालेल्यांमध्ये शालिकराम सहारे यांची पत्नी मीराबाई (५५ वर्षे) आणि मुलगा किशोर (४० वर्षे) यांचा समावेश आहे.

अक्षय एका सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करतो, तर सहारे कुटुंब मजुरी करते. हे दोन्ही कुटुंब शेजारी राहतात. गुरुवारी सायंकाळी काही कारणांवरून शालिकराम यांनी अक्षयच्या लहानग्या मुलाला गालावर थापड मारली. गालावर उमटलेले वळ पाहून अक्षयचे डोके भडकले. हातात रॅड घेऊन तो जाब विचारण्यासाठी गेला आणि मारायला सुरुवात केली. यात वर्मी घाव बसल्याने शालिकरामचा जागीच मृत्यू झाला. त्याला वाचविण्यासाठी गेलेली पत्नी आणि मुलगाही यात जखमी झाल्याची माहिती आहे.

हा प्रकार सुरू असताना परिसरातील नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांना माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक लोहित मतानी, पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली. शालिकराम आणि अन्य दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शालिकरामला मृत घोषित केले. अन्य दोघांवर उपचार सुरू आहेत.

आरोपीला अटक

दरम्यान, सायंकाळी आरोपी अक्षय शाहू याला अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक लोहीत मतानी यांनी दिली. या भांडणामागे अन्य कोणता वाद होता का, याचाही तपास पोलिस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhandara-acभंडारा