लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातून आतापर्यंत ४९५ व्यक्तींचे नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी ४०६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. सोमवारी एक व्यक्ती कोरोनाबाधित आढळला होता. त्यानंतर जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. मात्र प्रशासनाच्यावतीने युध्द पातळीवर उपाययोजना केल्या जात आहे.ग्रीन झोनमध्ये असलेला भंडारा जिल्हा सोमवारी आढळलेल्या एका रुग्णामुळे ऑरेंज झोनमध्ये गेला. मात्र त्यानंतर सदर कोरोनाबाधीत व्यक्तीच्या अतिजोखीम संपर्कासह इतरांच्या पाठविलेले सर्व नमुने निगेटिव्ह येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातून ४९५ व्यक्तींचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४०६ व्यक्तीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. १ मे रोजी ३३ आणि त्या आधी पाठविलेल्या ८८ अहवालाची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्डात २७ व्यक्ती दाखल असून नर्सिंग वसतीगृहाच्या अलगीकरण कक्षात ४८ व्यक्ती भरती आहेत. साकोली तुमसर व मोहाडी तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये ५४ व्यक्ती असे एकुण ९२ व्यक्ती संस्थाअंतर्गत अलगीकरणात दाखल आहेत. जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या फ्ल्यू ओपीडी अंतर्गत तीव्र श्वासदाहचे ९८ रुग्ण दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ९७ व्यक्तींचे नमुने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी ९३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. चार व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.महानगरातून दाखल झालेल्या १९ हजार ३१२ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला असून ६७१७ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. प्राथमिक आरोग्य व उपकेंद्रांतर्गत कार्यरत १०५३ आशांची आरोग्य तपासणी वैद्यकीय अधिकारी व सामुदायीक वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली आहे. घरोघरी जावून आशा व अंगणवाडी सेवीका तीव्र श्वासदाहच्या रुग्णाचे सर्वेक्षण करीत आहे.जिल्ह्याबाहेर जाणे व येण्यासाठी नोंदणी करालॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कामगार, प्रवासी, विद्यार्थी तसेच इतर नागरिकांची माहिती संकलीत करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्याबाहेर व जिल्ह्यात येणाºया इच्छूकानी आपली नावे प्रशासनाकडे नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी केली आहे. सदर नावांची यादी शासनाकडे पाठविण्यात येत आहे. ज्यांना जिल्ह्याबाहेर जायचे आहे किंवा जिल्ह्यात यायचे आहे त्यांनी जिल्हाधिकारी भंडारा प्रशासनाच्या अधिकृत वेबसाईटवर आपली माहिती नोंदवावी, तसेच जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या ०७१८४- २५१२२२ या दूरध्वनीवरही माहिती नोंदवावी.
जिल्ह्यातील ४९५ पैकी ४०६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 05:01 IST
ग्रीन झोनमध्ये असलेला भंडारा जिल्हा सोमवारी आढळलेल्या एका रुग्णामुळे ऑरेंज झोनमध्ये गेला. मात्र त्यानंतर सदर कोरोनाबाधीत व्यक्तीच्या अतिजोखीम संपर्कासह इतरांच्या पाठविलेले सर्व नमुने निगेटिव्ह येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातून ४९५ व्यक्तींचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी ४०६ व्यक्तीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. १ मे रोजी ३३ आणि त्या आधी पाठविलेल्या ८८ अहवालाची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे.
जिल्ह्यातील ४९५ पैकी ४०६ नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह
ठळक मुद्दे८८ अहवालांची प्रतीक्षा। तीव्र श्वासदाहचे ९८ व्यक्ती रुग्णालयात दाखल