सेंद्रिय शेती काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 10:57 PM2018-03-08T22:57:07+5:302018-03-08T22:57:07+5:30

कृषी विभाग भंडारा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे शेतकऱ्यासाठी हरभऱ्याची लागवड शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.

Organic farming requires time | सेंद्रिय शेती काळाची गरज

सेंद्रिय शेती काळाची गरज

Next
ठळक मुद्देप्रज्ञा गोडघाटे : चिखलीत हरभºयाची लागवड, कमी खर्चात जास्त पिकाचे प्रात्याक्षिक

आॅनलाईन लोकमत
खरबी (नाका) : कृषी विभाग भंडारा व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली येथे शेतकऱ्यासाठी हरभऱ्याची लागवड शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले.
शेती शाळेचे उद्घाटन विभागीय कृषी सहायक प्रज्ञा गोडघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुरेश गणवीर तसेच मंडळ कृषी अधिकारी दिपक आहेरू, कृषी सहायक रेणुका दराडे, बीटीएम सतीश वैरागडे उपस्थित होते.
यावेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना प्रज्ञा गोळाघाटे यांनी हरभरा पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जमिनीची मशागत, अरूंद सरी, वरबापद्धत बीज प्रक्रिया, तुषार सिंचनद्वारे पाण्याचे नियोजन, किडरोग व्यवस्थापन तसेच पक्षी थांबायच्या वापर केल्यास किडीवरती आळा घालता येतो, असे आपल्या मार्गदर्शनात शेतकºयांना सांगितले. यावेळी प्रगतशिल शेतकरी तानाजी गायधने यांच्या शेतातील पाणाण भेद या औषधी वनस्पतीची पाहणी करून इतर शेतकºयांनीही सेंद्रीय शेतीकडे वळण्यास सांगितले.
कृषी विभागाच्या वतीने ग्राम चिखली येथील ५० शेतकºयांनी गट सेंद्रीय शेतीसाठी निवडला असून शेतकºयांना गांढूळखत निर्मिती, अर्का विषयी प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी कृषी मित्र श्याम आकरे याने कमी खर्चात एकरी १४ क्विंटल धानाचे उत्पन्न मिळाल्याचे सांगितले. यावेळी शेतकºयानी शेती करण्याच्या निर्धार केला. त्यानंतर कृषी साहाय्यक रेणुका दराडे यांनी १० ते १४ मार्च दरम्यान दसरा मैदान भंडारा येथे होणाºया कृषी महोत्सवात महिला बचत गटानी आपआपल्या मालाच्या विक्रीकरीता तसेच शेतकºयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुरेश गणवीर यांनी आपल्या मनोगणात शासनाच्या विविध योजनांची माहिती सांगून यावर्षीच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रधानमंत्री सुक्ष्म सिंचन योजना, ठिंबक, तुषार सिंचन योजनांच्या लाभ घेऊन जास्तीत जास्त उत्पादन वाढीसाठी कृषी विभागाची मदत घेण्याचे आवाहन केले आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी दिपक अहेर यांनी शेतीबरोबर दुग्ध व्यवसायातून आर्थिक प्रगती साधण्याचे आवाहन केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतखताच्या फायद्या मोठ्या प्रमाणात होत असतो. शेतीशाळेच्या कार्यक्रमासाठी प्रगतशील शेतकरी कृषीमित्र, ग्रा.पं. सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सतीश वैरागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन तानाजी गायधने यांनी केले.

Web Title: Organic farming requires time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.