शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सहा धान खरेदी केंद्र बंदचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:01 IST

मोहाडी तालुक्याच्या डोंगरगाव येथील मातोश्री विमलबाई बहुउद्देशिय सुशिक्षित सहकारी संस्थेतर्गत उसर्रा, कांद्री, डोंगरगाव आणि तुमसर येथील पार्वताबाई बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेंतर्गत तुमसर, डोंगरी बुज. आणि मिटेवानी येथील धान खरेदी केंद्रांचा समावेश आहे. उन्हाळी धान खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.

ठळक मुद्देअनियमिततेचा ठपका : तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील केंद्र, मार्केटिंग फेडरेशन सरव्यवस्थापकांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : धान खरेदीत अनियमिततेचा ठपका ठेवत मोहाडी आणि तुमसर तालुक्यातील सहा धान खरेदी केंद्र बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सदर आदेश दि महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या सरव्यवस्थापकांनी दिले आहे. सदर केंद्र लगतच्या गावांना जोडण्याचेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.मोहाडी तालुक्याच्या डोंगरगाव येथील मातोश्री विमलबाई बहुउद्देशिय सुशिक्षित सहकारी संस्थेतर्गत उसर्रा, कांद्री, डोंगरगाव आणि तुमसर येथील पार्वताबाई बहुउद्देशिय सुशिक्षित बेरोजगार सहकारी संस्थेंतर्गत तुमसर, डोंगरी बुज. आणि मिटेवानी येथील धान खरेदी केंद्रांचा समावेश आहे. उन्हाळी धान खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. धान केंद्रावरील अनियमिततेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीने केली. त्यांनी आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्रनिहाय कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. संंबंधित केंद्राविरूद्ध शहनिशा करून आवश्यक कारवाई व फौजदारी कारवाई करावी, असेही आदेशीत करण्यात आले होते.जिल्हाधिकाºयांकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या संस्थेमध्ये धान खरेदीत अनियमितता झाल्याचे सिद्ध झाले. त्यावरून महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे सरव्यवस्थापकांनी विभागीय व्यवस्थापकांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार या सहा केंद्रावरील खरेदी तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले. या खरेदी केंद्रांतर्गत असणाºया शेतकऱ्यांचे नुकसान होवू नये यासाठी सदर गावे इतर खरेदी केंद्रांना जोडण्याचे स्पष्ट निर्देश या आदेशात देण्यात आले आहे.या आदेशानंतर जिल्हा पणन अधिकाºयांनी तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि संबंधित संस्थेला पत्र पाठविले आहे. यापुढे सदर केंद्रावर उन्हाळी धान खरेदी करू नये, असे स्पष्ट म्हटले आहे.ग्रेडर अडकला होता एसीबीच्या जाळ्यातजिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी वारंवार करण्यात आल्या. शेतकºयांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्यानंतरही काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून धान मोजणीसाठी पैशाची मागणी होत असल्याचे पुढे आले. कोणतीच कारवाई होत नसल्याचे पाहून एका शेतकऱ्याने भंडारा लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीवरून कांद्री येथील धान खरेदी केंद्राचा ग्रेडर पैशाची मागणी करीत असल्याचे पुढे आले आणि एसीबीच्या जाळ्यात अडकला. असेच प्रकार जिल्ह्यातील अनेक केंद्रावर पुढे आले. मात्र तक्रार करण्यास कुणी धजावत नाही.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड