शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

एकच शिष्यवृत्ती फॉर्म वर्षातून तीनदा भरण्याचे आदेश; शिष्यवृत्तीचा घोळ संपता संपेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 14:00 IST

Bhandara : मंजूरीसाठी विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांची होतेय दमछाक

विलास खोब्रागडे लोकमत न्यूज नेटवर्कसिल्ली (आंबाडी) : जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांना देय असलेल्या वार्षिक शिष्यवृत्तीची देयके आधी ऑनलाइन, मग ऑफलाइन, आता पुन्हा ऑफलाइन असा एकच शिष्यवृत्ती फॉर्म वर्षातून तीनदा भरून सादर करण्याचे आदेश आले. त्यामुळे एकच काम वारंवार करताना शिक्षकांची डोकेदुखी वाढली असून, आर्थिक वर्ष संपत असतानादेखील शालेय शिष्यवृत्तीचा घोळ संपता संपेना, अशी शालेय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची दयनीय अवस्था झाली आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण फी व परीक्षा फी, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती आदी शिष्यवृत्तीची देयके योग्य प्रस्ताव सादर केले जातात.

आधी ऑफलाइन देयकेसन २०२४-२५ मध्ये शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे संवर्गनिहाय प्रपत्र, एपीपी-१८, बँकेचे तपशील, शाळा मान्यता प्रत, मुख्याध्यापक नमुना स्वाक्षरी प्रत, मागील शिष्यवृत्ती वाटप पावती, उत्पन्न दाखले, जातींचे प्रमाणपत्र आदींसह ऑफलाइन शिष्यवृत्ती देयके शाळांनी सादर केले.

ऑनलाइन शिष्यवृत्तीचे काम केले पूर्णएका महिन्यातच ऑफलाइन शिष्यवृत्तीची देयके रद्द करून नवीन फॉरमॅटमध्ये ऑनलाइन देयके तयार करून नव्याने हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले. त्यामुळे शाळांनी धावपळ करून कसे बसे ऑनलाइन शिष्यवृत्तीचे काम पूर्ण केले.

पुन्हा ऑफलाइनसन २०२४-२५ हे आर्थिक व शैक्षणिक वर्ष संपण्याकरिता अवघा एक आठवडा असताना आता पुन्हा शाळास्तरावरील अनुसूचित जाती मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे ऑफलाइन पद्धतीने पंचायत समिती स्तरावर २४ मार्च पर्यंत जमा सूचना देण्यात आल्या.

ऑनलाइनच्या नादात वाढली डोकेदुखीजिल्ह्यातील शिक्षक शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि विकास आराखड्याच्या १२८ मानकांची जुळवाजुळव करणे, निपुण भारत उपक्रम राबविणे, उल्लास नवभारत पायाभूत व संख्याज्ञान चाचणीचे नियोजन करणे, यू-डायस पल्स प्रणाली अद्ययावत करणे आदी कामांत व्यस्त आहेत. यात आता शिष्यवृत्तीची देयके पुन्हा ऑफलाइन करण्याचे काम वाढले. त्यामुळे ऑनलाइन, ऑफलाइन शिष्यवृत्तीच्या नादात शिक्षकांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे.

टॅग्स :bhandara-acभंडाराScholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षण