किसान संघाच्या जिल्हाध्यक्षाला अखेर पीक कर्ज देण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:38 AM2021-09-26T04:38:43+5:302021-09-26T04:38:43+5:30

आईच्या नावावर पीक कर्जाची थकबाकी असल्याचे कारण संस्थेने पुढे करुन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सिहोराचे सभासद असतानाही मोतीलाल ...

Order to finally give crop loan to the district president of Kisan Sangh | किसान संघाच्या जिल्हाध्यक्षाला अखेर पीक कर्ज देण्याचे आदेश

किसान संघाच्या जिल्हाध्यक्षाला अखेर पीक कर्ज देण्याचे आदेश

Next

आईच्या नावावर पीक कर्जाची थकबाकी असल्याचे कारण संस्थेने पुढे करुन विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सिहोराचे सभासद असतानाही मोतीलाल ठवकर यांना संस्थेने पीक कर्ज नाकारले होते. शेतकऱ्यांची कैफियत संस्थेच्या कार्यकारी मंडळाने जाणून घेतली नाही. ठवकर यांच्या आई आजारी असल्याने त्यांना पीक कर्जाची परतफेड करता आली नाही. आईच्या नावावर पीक कर्जाची थकबाकी असल्याचे कारणावरून त्यांना पीक कर्ज मंजुरी नाकारण्यात आले आहे. शेतकऱ्यांचे न्यायासाठी सदैव भांडणाऱ्या किसान संघाच्या जिल्हाध्यक्षाला पीक कर्जापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने सर्वच स्तरावरून विरोध पत्करावा लागला होता. त्यांनी उन्हाळी धान याच संस्थेला दिले होते. ८० क्विंटल धानाचे चुकारे अडल्याने त्यांनी आईचे कर्ज फेडले नाही. याच संस्थेकडे जवळपास २ लाखांचे चुकारे होते. परंतु पीक कर्ज मंजूर करताना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कार्यकारी मंडळाने ऐकले नाही. यानंतर न्यायासाठी सहायक निबंधकाचे दरवाजा ठोठावला असल्यानेच त्यांना न्याय मिळाला आहे. २३ ऑगस्टला सहायक निबंधकांनी शेतकरी मोतीलाल ठवकर यांना पीक कर्ज देण्याचे निर्देश सेवा सहकारी संस्थेच्या कार्यकारी मंडळाला दिले आहेत.

Web Title: Order to finally give crop loan to the district president of Kisan Sangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.