शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
12
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
14
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
15
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
16
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
17
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
18
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
19
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
20
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू

कोविड केअर सेंटरमधील पीपीई कीट उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST

सिंदपुरी येथे कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. तेथे संशयीत आणि लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना ठेवले जाते. याठिकाणी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अनुदानित शाळांवरील शिक्षकांचा समावेश आहे. येथे सुरूवातीपासूनच स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. महापुराचे पाणी या कोविड केअर सेंटरमध्ये शिरले होते. त्यानंतर पुरेशी देखभाल न करताना येथेच पुन्हा रुग्णांना ठेवले जात आहे.

ठळक मुद्देसिंदपुरी येथील प्रकार । विविध समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : कोविड केअर सेंटरमध्ये वापरलेल्या पीपीई कीटची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे प्रशासनाचे निर्देश असतानाही पवनी तालुक्यातील सिंदपुरी येथे पीपीई कीट उघड्यावर फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येथे विविध समस्या निर्माण झाल्या असून याठिकाणी नियुक्त केलेल्या शिक्षकांना मनस्त:प सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.सिंदपुरी येथे कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. तेथे संशयीत आणि लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना ठेवले जाते. याठिकाणी डॉक्टर, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात अनुदानित शाळांवरील शिक्षकांचा समावेश आहे. येथे सुरूवातीपासूनच स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. महापुराचे पाणी या कोविड केअर सेंटरमध्ये शिरले होते. त्यानंतर पुरेशी देखभाल न करताना येथेच पुन्हा रुग्णांना ठेवले जात आहे.येथील रुग्णांना तपासताना डॉक्टर व कर्मचारी पीपीई कीटचा उपयोग करतात. मात्र त्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट केली जात नसल्याचे दिसून येते. शनिवारी वापरलेले पीपीई कीट कोविड केअर सेंटरच्या लगतच फेकून दिल्याचे दिसून आले. त्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांनी याबाबत वरिष्ठांकडे माहिती दिली आहे. परंतु उपाययोजना केल्या जात नाही.रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना प्रशासनाने कोणत्याही सुविधा पुरविल्या नाही. कोविड सेंटर सांभाळणारे डॉक्टर, कर्मचारी या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथे नियुक्त करण्यात आलेले शिक्षक करीत आहे. गंभीर बाब म्हणजे वापरलेल्या पीपीई कीटची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे या पीपीई कीटशी कुणाचा संपर्क आल्यास कोरोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे कार्यरत शिक्षकांनाही त्यापासून धोका होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून येथे नियुक्त शिक्षकांना सुविधा द्यावी आणि पीपीई कीटची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या