शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जलशुद्धीकरण केंद्राचा कारभार सांभाळतात केवळ दोन कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 00:46 IST

संपूर्ण भंडारा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेच्या अखत्यारितील जलशुद्धीकरण केंद्राचा कारभार केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर सुरू आहे. त्यातही एक कर्मचारी कंत्राटी आणि दुसरा कायम स्वरूप आहे.

ठळक मुद्देआवश्यकता १८ कर्मचाऱ्यांची । सुरक्षा रक्षकाअभावी रामभरोसे कारभार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण भंडारा शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या नगरपरिषदेच्या अखत्यारितील जलशुद्धीकरण केंद्राचा कारभार केवळ दोन कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर सुरू आहे. त्यातही एक कर्मचारी कंत्राटी आणि दुसरा कायम स्वरूप आहे. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता राखताना अडचणीचा सामना करावा लागतो आणि नागरिकांना अशुद्ध पाणी प्राशन करावे लागते.भंडारा शहराला पाणीपुरवठा करणारी जलशुद्धीकरण केंद्र शासकीय रुग्णालय परिसरात आहे. या केंद्रात वैनगंगेचे पाणी शुद्ध करून नळावाटे नागरिकांना पुरविले जाते. कालबाह्य झालेले येथील संयत्र वारंवार नादुरूस्त होते. तसेच तीन पाळी येथील यंत्रणा सुरू असते. परंतु सध्या येथे दोनच कर्मचारी कार्यरत आहे. खरे तर येथे १८ कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यात पंप आॅपरेटर, सफाई कामगार, खोदकाम करणाºयांचा समावेश आहे. परंतु गत काही वर्षांपासून दोघांच्या भरोशावर जलशुद्धीकरण केंद्राचा कारभार सुरू आहे. विशेष म्हणजे त्यातील एक कर्मचारी हा २००८ साली सेवानिवृत्त झाला आहे. सध्या त्यांना पाच हजार रूपये महिनाप्रमाणे कंत्राटी तत्वावर काम दिले आहे. तर एक कर्मचारी कायमस्वरूपी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात जलशुद्धीकरण करताना या दोघांची मोठी कसरत होते. वारंवार नगरपरिषदेला कळवूनही पाणीपुरवठत्त विभाग याकडे लक्ष देत नाही. परिणामी नागरिकांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा होतो आणि त्यातून आजार बळावतात.भंडारा शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्र सुरक्षा रक्षकाअभावी वाºयावर आहे. अतिशय संवेदनशील असलेल्या या जलशुद्धीकरण केंद्रात कुणीही थेट प्रवेश करू शकतो. एखाद्या माथेफिरूने घातपात केल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यता आहे. परंतु नगरपरिषद प्रशासन असंवेदनशील झाली असून पदाधिकाºयांच्या अनास्थेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जलशुद्धीकरण केंद्राच्या सर्व बाजू उघड्या आहेत.

टॅग्स :Waterपाणी