बाराशे लोकसंख्येमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 05:00 AM2020-07-31T05:00:00+5:302020-07-31T05:01:29+5:30

जिल्ह्यात भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. तुमसर व साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय असून पवनी, अड्याळ, लाखांदूर, लाखनी, मोहाडी, पालांदूर, सिहोरा या सात ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १९३ उपकेंद्र, २९ आयुर्वेदिक दवाखाने, चार आंग्ल दवाखाने आहेत. जिल्हा परिषद व आरोग्य विभागाला दरवर्षी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो.

Only one health worker per twelve hundred population | बाराशे लोकसंख्येमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

बाराशे लोकसंख्येमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील आरोग्य विभागात ४९२ पदे रिक्त : कोरोनासह संसर्गजन्य आजारात ताणतणाव असतानाही रुग्णसेवेसाठी आरोग्य विभाग तत्पर

देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आरोग्यम् धन संपदा, असे म्हटले जाते. मात्र अलिकडे कोरोना संकट आणि पावसाळी आजाराचे रुग्ण वाढत असताना रुग्णसेवा करताना भंडारा जिल्हा आरोग्य प्रशासनाला दमछाक करावी लागत आहे. भंडारा जिल्ह्यात रिक्त पदांचा आजार जडला असतानाही संकटकाळात रुग्णसेवा हीच खरी सेवा याप्रमाणे अधिकारी व कर्मचारी सेवा करीत आहे. बाराशे लोकांमागे केवळ एक आरोग्य कर्मचारी सेवा बजावत आहेत.
जिल्ह्यात भंडारा येथे जिल्हा सामान्य रुग्णालय आहे. तुमसर व साकोली येथे उपजिल्हा रुग्णालय असून पवनी, अड्याळ, लाखांदूर, लाखनी, मोहाडी, पालांदूर, सिहोरा या सात ठिकाणी ग्रामीण रुग्णालये आहेत. जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र, १९३ उपकेंद्र, २९ आयुर्वेदिक दवाखाने, चार आंग्ल दवाखाने आहेत. जिल्हा परिषद व आरोग्य विभागाला दरवर्षी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. तो निधी दरवर्षी ९५ टक्के खर्च केला जात आहे. रुग्णसेवा करतांना रिक्त पदांचा बॅकलॉग उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
अनेक वर्षांपासून आरोग्य विभागातील पदभरती रखडल्याने कामावर ताण पडत आहे. असे असतानाही आता कोरोनाचे संकट व पावसाळी आजाराने रुग्णसंख्या वाढत आहेत. मात्र केंद्र सरकार व राज्य शासनाच्या आवाहनानंतर आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचारी व अधिकारी डोळ्यात तेल टाकून रुग्णसेवा करण्यासाठी झटत आहेत.
सध्या भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाख ९५ हजार ६०२ आहे. त्या तुलनेत आरोग्य विभागात रिक्त पदे ४९२ असून येथे महिला रुग्णालयांचा प्रश्न अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पद अद्यापही रिक्त आहे. सध्या प्रभाराच्या भरोश्यावर कारभार सुरु आहे. जिल्ह्यावरील संकट लक्षात घेता आरोग्यसेवेसाठी राज्य शासनाने रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे. ग्रामणी आरोग्य यंत्रणेबाबत वारंवार तक्रारी होत असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही.
 

Web Title: Only one health worker per twelve hundred population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य