शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात केवळ पाच हजार हेक्टरचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाला. सातही तालुक्यात या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४५४ गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले असले तरी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देउद्ध्वस्त धान : कृषी आणि महसूल विभागात समन्वयाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या आहेत. शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. मात्र भंडारा जिल्ह्यात अतिशय संथगतीने नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे. आठवडाभरात केवळ पाच हजार हेक्टर क्षेत्राचेच सर्वेक्षण झाल्याचे प्रशासन सांगत आहे. दुसरीकडे महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये सर्वेक्षणात समन्वय दिसत नाही. परिणामी सर्वेक्षणाला विलंब होवून शेतकºयांना मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.भंडारा जिल्ह्यात २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान परतीचा पाऊस झाला. सातही तालुक्यात या पावसाने धान पिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यातील ४५४ गावांना परतीच्या पावसाचा फटका बसला. शेकडो हेक्टरवरील धान पीक उद्ध्वस्त झाले असले तरी कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केवळ आठ हजार ८० हेक्टरवरच नुकसान झाल्याचे म्हटले आहे.दिवाळीच्या सुट्टीनंतर कृषी व महसूलचे कर्मचारी सर्व्हेक्षणाच्या कामाला लागले आहे. मात्र आजही अनेक शेताच्या बांधावर सर्व्हेक्षक पोहचत नसल्याची ओरड शेतकरी करीत आहेत.शेतकऱ्यांना पीक विम्याच्या भरपाईची अपेक्षा आहे. अनेक शेतकरी मदतीकडे आस लावून बसले आहे. परंतु संथगतीने होणाºया या सर्व्हेक्षणामुळे मदतीला दीर्घकाळ लागण्याची शक्यता आहे. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार आठ हजार क्षेत्रापैकी आतापर्यंत पाच हजार हेक्टरच्या आसपास सर्व्हेक्षण झाल्याचे कृषी विभाग सांगत आहे. खरे पाहता जिल्ह्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु योग्य सर्व्हेक्षणाअभावी अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती आहे.महसूल आणि कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांत समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. कृषी विभागाचे कर्मचारी बांधावर पोहचताच ते योग्य मुल्यांकन करून नुकसानीचे क्षेत्र ठरवित आहे. परंतु महसूल विभागाचे कर्मचारी पुढील तीन टप्प्यातील याद्यांचा त्रास वाचविण्याच्या नादात नुकसानीचा आकडा कमी दाखवत असल्याची खात्रीलायक माहिती आहे. या समन्वयातील अभावामुळे अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.५४२ अर्जांचे पंचनामेकृषी विभागाच्या आवाहनानुसार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त १७९२ शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. विहित नमुन्यातील अर्जासोबत नुकसानीचे फोटोही अपलोड केले. विविध कागदपत्रांची जुडवा जुडव करून शेतकऱ्यांनी अर्ज तर सादर केले मात्र आतापर्यंत त्यापैकी केवळ ५४२ अर्जांचे पंचनामे करण्यात आले आहे. उर्वरित पंचनामे केव्हा केले जातील याबाबत कुणीही निश्चित सांगत नाही.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस