शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

पूर्व विदर्भातील ३८४ प्रकल्पात केवळ ४८.६९ टक्के जलसाठा; उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 07:00 IST

Nagpur News पावसाने दडी मारल्याने पूर्व विदर्भातील ३८४ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ४८.६९ टक्के जलसाठा आहे.

ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत २३.८६ टक्के कमी

ज्ञानेश्वर मुंदे

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : पावसाने दडी मारल्याने पूर्व विदर्भातील ३८४ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ ४८.६९ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत या प्रकल्पांमध्ये ७२.५५ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत २३.८६ टक्के जलसाठा कमी आहे. जोरदार पाऊस बरसला नाही तर रबी हंगामातील सिंचन आणि उन्हाळ्यात पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे.

(Only 48.69 per cent water storage in 384 projects in East Vidarbha)

पूर्व विदर्भात १६ मोठे प्रकल्प, ४२ मध्यम आणि ३२६ लघु प्रकल्प आहेत. भात शेतीसाठी या प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. दरवर्षी या प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा असतो. त्यामुळे रबी हंगामातही प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाते; मात्र यंदा पावसाने दीर्घ विश्रांती घेतली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यात तर पावसाने सरासरीही गाठली नाही. परिणामी, प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली नाही.

नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये २७८४.९८ दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी ५६.१८ असून, गतवर्षी या प्रकल्पात ७७.३१ टक्के जलसाठा होता. ४२ मध्यम प्रकल्पात सद्यस्थितीत २२८.७७ दलघमी जलसाठा असून, त्याची टक्केवारी ३१.४५ आहे. गतवर्षी या प्रकल्पात ५८.८७ टक्के जलसाठा होता. ३२६ लघू प्रकल्पात १२८.३७ दलघमी जलसाठा असून, त्याची टक्केवारी १९.२३ आहे. गतवर्षी या प्रकल्पांमध्ये ५७.२१ टक्के जलसाठा होता. सर्व ३८४ प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत सरासरी २३.८६ जलसाठा कमी आहे.

 

टॅग्स :water shortageपाणीकपात