शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

साकोली तालुक्यात केवळ २५ टक्के भात रोवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2020 22:24 IST

साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने रोवणी करण्यास शेतकरी मागेपुढे पाहत आहे.

ठळक मुद्देसिंचन सुविधेचा अभाव : लॉकडाऊनने शेतकरी आर्थिक टंचाईत, दोन्ही प्रकल्प ठरले पांढरा हत्ती

संजय साठवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : निसर्गाचा लहरीपणा आणि कोरोना महासंकटाने यंदा साकोली तालुक्यातील रोवणी रखडली आहे. आतापर्यंत केवळ २५ टक्के क्षेत्रावरच रोवणीचे काम आटोपले आहे. सिंचनाच्या सुविधेचा अभाव आणि आर्थिक टंचाईमुळे उर्वरित रोवणी कधी पूर्ण होईल, असा प्रश्न आहे. तर तालुक्यातील दोन प्रकल्प केवळ पांढरा हत्ती ठरत आहे.साकोली तालुक्यात भात लागवडीखाली १८ हजार ५०१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी केवळ चार हजार ८२ हेक्टर क्षेत्रात रोवणी गत सोमवारपर्यंत आटोपली होती. खरे पाहता ही रोवणी २५ टक्केपेक्षाही कमी आहे. मात्र त्यानंतर तालुक्यात आलेल्या पावसाने रोवणीची गती वाढली. परंतु अद्यापही पूर्ण क्षमतेने रोवणी करण्यास शेतकरी मागेपुढे पाहत आहे.गतवर्षी सुरूवातीला पाऊस आला आणि नंतर अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फसका बसला. यावर्षी तसेच होवू नये म्हणून शेतकरी सावध पवित्रा घेत आहे. आधीच कोरोना संकटामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. बि-बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी आर्थिक विवंचना अद्यापही आहे. धान विक्रीचे पैसेही शेतकऱ्यांना उशिरा मिळाले. सध्या अनेक शेतकऱ्यांचे पैसे मिळणे बाकी आहे. एकीकडे आस्मानी आणि दुसरीकडे सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.आठ तास वीज पुरवठासध्या पावसाने दडी मारली आहे. रोवणीची वेळ निघून जात आहे. त्यामुळे शेतकºयांनी लगबग वाढली आहे. अनेक शेतकºयांनी सिंचनासाठी आपल्या शेतात विहिरी, बोरवेल खोदून सोय उपलब्ध केली. परंतु वीज पुरवठ्याचा अडसर कायम आहे. शेतकऱ्यांना केवळ आठ तासच वीज पुरवठा होत आहे. त्याचा परिणामही रोवणीवर होत आहे. १६ तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. तसेच कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचीही मागणी होवू लागली आहे. अनेक शेतकरी कोरोनामुळे आर्थिक विवंचनेत सापडले आहे.दोन्ही सिंचन प्रकल्प अपूर्णसाकोली तालुक्यातील कुंभली येथील निम्न चुलबंध प्रकल्पाचे काम जवळपास २० वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पाचे बहुतेक काम पूर्ण झाले असले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही. दुसरा प्रकल्प वडेगाव येथील भिमलकसा प्रकल्प होय. याप्रकल्पाचे काम २५ वर्षापुर्वी करण्यात आले होते. मात्र २५ टक्के काम शिल्लक असताना हा प्रकल्प वनकायद्याच्या कचाट्यात सापडला. तेव्हापासून हा प्रकल्प रखडलेलाच आहे. निवडणुकीच्या काळात हा प्रकल्प पूर्ण करू, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अद्यापही कोणत्याच हालचाली दिसत नाही.साकोली तालुक्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. कुठेही खताची टंचाई नाही. शेतकºयांना काही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ कृषी कार्यालयाशी संपर्क साधवा.-सागर ढवळे, तालुका कृषी अधिकारी, साकोली.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस