भंडारा : महिला ही अबला नसून, शक्तीशाली आहे. आजची महिला ही पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. आजची महिला पुरूषांपेक्षाही एक पाऊल पुढे आहे, असे प्रतिपादन सरपंच माधुरी देशकर यांनी केले.जागतिक महिला दिनानिमित्त गणेशपूर ग्रामपंचायतमध्ये महिला आरोग्य पंधरवाडा बुधवारी साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परीषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच यशवंत सोनकुसरे, सुधा चवरे, दामिणी सळमते, किर्ती गणविर, वनिता भुरे, संध्या बोदेले, सुभद्रा हेडावू, मधूमाला बावनउके, कावळे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदी उपस्थित होते. महिला दिनानिमित्त ० ते १ वर्ष वयोगटातील मुलींचा सत्कार करण्यात आला.गरोगर मातेची ओटी भरणे, आरोग्याची माहिती भरणे, आरोग्य शिबिर आदी विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी गणेशपूर येथील महिलांची संख्या लक्षणीय होती. डॉ. डोईफोडे यांनी महिलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आवश्यक तपासण्या नियमित करण्याचे आवाहन केले. यावेळी अंगणवाडीसेविका यांनी पोषण आहाराविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी यशवंत सोनकुसरे यांनी गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. शासकीय योजनांचा त्यानी लाभ घ्यावा. असे आवाहन केले. संचालन सदस्य वनिता भुरे तर आभार प्रदर्शन अंगणवाडीसेविका बावनकुळे यांनी केले. (नगर प्रतिनिधी)
महिला पुरूषांपेक्षा एक पाऊल पुढेच
By admin | Updated: March 13, 2015 00:46 IST