शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शाळा एक, भरते तीन ठिकाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:07 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते १० मे १९६६ ला उद्घाटन झालेल्या शाळेची अवस्था मात्र आज अतिशय भीषण झाली आहे. जीर्ण झालेल्या वर्गखोलीचे छत चार महिन्यापूर्वी काढून घेण्यात आले. बाजूच्या एका खोलीत विद्यार्थ्यांना शिकविले जाते.

ठळक मुद्देपिलांद्रीची शाळा । चार महिन्यापासून शाळेचे छत नाही

विशाल रणदिवे ।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते १० मे १९६६ ला उद्घाटन झालेल्या शाळेची अवस्था मात्र आज अतिशय भीषण झाली आहे. जीर्ण झालेल्या वर्गखोलीचे छत चार महिन्यापूर्वी काढून घेण्यात आले. बाजूच्या एका खोलीत विद्यार्थ्यांना शिकविले जाते. शाळा एक असली तरी वर्ग मात्र तीन ठिकाणी भरविण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. वर्गखोलीचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी पिलांद्री येथील पालकांनी केली आहे.पवनी तालुक्यातील पिलांद्री येथील शाळा परिसरात नावाजलेली होती. परंतु १९६६ मध्ये बांधलेली ही शाळा आता जीर्ण झाली आहे. डागडुजीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या शाळेची अवस्था अतिशय दयनीय झाली. त्यातच चार महिन्यापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली छत काढण्यात आले. परंतु पावसाळा सुरु झाला तरी छत टाकण्यासाठी मुहूर्त झाला नाही. त्यामुळे शाळा एक असली तरी तीन ठिकाणी भरविली जात आहे. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी प्रसाधनगृहाचाही अभाव आहे. पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्यासाठी घर गाठावे लागते. १२० विद्यार्थी पटसंख्या असलेल्या या शाळेत ज्ञानार्जन करताना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. शाळेत एक संगणक असून या कक्षातही विद्यार्थ्यांना बसविण्याशिवाय पर्याय नाही.या शाळेची इमारत तीन वर्षापासून आहे त्या अवस्थेत आहे. प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. क्रीडांगण नाही. परिपाठासाठी एक खोली आहे. त्या खोलीत १२० विद्यार्थी कसेबसे बसतात. या सर्व प्रकारामुळे विद्याथ् र्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. जीर्ण झालेल्या शाळेत अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे वर्गखोलीचे तात्काळ बांधकाम करावे अशी मागणी सरपंच भारती मडावी व गावकऱ्यांनी केली आहे.अपघाताची भीतीशाळेच्या जीर्ण इमारतीत १२० विद्यार्थी शिकतात. या शाळेचे छत काढून ठेवण्यात आले आहे. इमारतीच्या भींतीही खिळखिळ्या झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघाताची कायम भीती असते. विद्यार्थी व शिक्षक जीव मुठीत घेऊन येथे ज्ञानार्जन करताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष देऊन या शाळा इमारतीचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.भौतिक सुविधा विषयींचा अहवाल आपण दरवर्षी जिल्हा परिषदेला पाठवितो. दुरुस्तीची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या वतीने शाळांची निवड करून केली जाते.-एन.टी. टिचकुले, गटशिक्षणाधिकारी, पवनी.

टॅग्स :Schoolशाळा