शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

चांदपूर जलाशयाचा एक मीटरने पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 01:00 IST

चांदपूर गावात विहिरींनी तळ गाठला असल्याने भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. कालव्यांना पाणी वाटप करणाऱ्या जलकुंभात पाणी नसल्याने संकट ओढवले आहे. या जलकुंभात पाण्याची साठवणुक करण्यासाठी एक मिटरने जलाशयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देपाणीटंचाई: पाणी सोडण्यासाठी आमदारांचे पत्र, जलकुंभात साठवणूक करणार

रंजीत चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : चांदपूर गावात विहिरींनी तळ गाठला असल्याने भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. कालव्यांना पाणी वाटप करणाऱ्या जलकुंभात पाणी नसल्याने संकट ओढवले आहे. या जलकुंभात पाण्याची साठवणुक करण्यासाठी एक मिटरने जलाशयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.चांदपूर गावात असणाºया विहिरी एप्रिल महिन्यातच कोरड्या पडल्या आहेत. जलकुंभाशेजारी असणारा सौर उर्जेवरील पंपगृह बंद पडला आहे. यामुळे पाणी टंचाईच्या संकटात भर पडली आहे. या जलकुंभातून गावकरी, जागृत हनुमान देवस्थानात दाखल होणारे भाविक तथा वन विभागाचे नर्सरीला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु टाकीतील पाणी आटल्याने नर्सरीतील कोट्यवधींचे रोपवन कोमेजण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जलाशयाच्या गावातच पाण्याचा गंभीर संकट निर्माण झाला आहे. जलाशयाचे पाणी विसर्ग करण्याचे अधिकार पाटबंधारे विभागाला आहेत. परंतु पाण्याचा विसर्ग करतांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेतली जात आहे. यंदा उन्हाळी धान पिकांना पाण्याचे वाटप नाकारण्यात आले आहे. यामुळे जलाशयात १८ फुट पाण्याची शिल्लक साठवणूक आहे. या पाण्याचा उपयोग आता नागरिकांना पिण्याच्या कार्याकरिता येणार आहे. चांदपूर गावात निर्माण झालेली पाणी टंचाई निवारण्यासाठी आमदार चरण वाघमारे यांनी पाटबंधारे विभागाला पत्र दिले आहे.याशिवाय सरपंच उर्मिला हेमराज लांजे आणि वन विभागाने पत्रातून पाणी सोडण्याचे पत्र दिले. चादंपूर जलाशयाचे एक मीटरने दरवाजा उघडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. विसर्ग होणारे पाणी टाकीत साठवणूक केले जाणार आहे. या पाण्याचे शुल्क तिन्ही विभागाकडून घेतले जाणार आहे. ग्रामपंचायत, देवस्थान आणि वन विभाग यांचेकडून राशी वसुली केली जाणार आहे. या पाण्याची वसुली ७० हजार रुपयांचे घरात असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येकी २२ हजार रुपये अशी वसुली येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाण्याचे विभागणी अमंलबजावणी सुरु करण्यात आली आहे.चांदपूर गावात विहिरी आटल्या असल्याने जलाशयाचे पाणी सोडण्याचे पत्र दिले आहे. निधी प्राप्त होताच पाण्याची राशी दिली जाईल.- उर्मिला लंजे,सरपंच, चांदपूरजलाशयाचे पाणी जलकुंभात विसर्ग करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. या पाण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे. विसर्गानुसार शुल्काची आकारणी करण्यात येईल.- एन. जे. मिरत,शाखा अभियंता, सिहोराबावनथडी, वैनगंगा नद्यांचे पात्र आटलेसिहोरा परिसरातील बावनथडी नदीचे पात्र पुर्णत: आटले असल्याने परिसरातील तथा मध्यप्रदेशातील नद्यांचे काठावरील गावात पाणी टंचाईची झळ सुरु झाली आहे. या नदी पात्रात राजीव सागर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी सुरु झाली आहे. वैनगंगा नदीवर धरण असले तरी या धरणात अल्प जलसाठा आहे. यामुळे नळयोजना अडचणीत आलेल्या आहेत. शेतशिवारात असणाऱ्या विहिरींची पातळी खोलवर गेली असल्याने उन्हाळी धान पिकांना पाणी वाटप करणे शेतकऱ्यांना जीकरीचे ठरत आहे. पिण्याचे पाणी तथा शेती सिंचित करण्यासाठी थ्री फेज वीज पुरवठा १६ तासांचे करण्याची मागणी गावात नागरिक करित आहेत.

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशय