चांदपूर जलाशयाचा एक मीटरने पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:59 AM2019-04-26T00:59:29+5:302019-04-26T01:00:56+5:30

चांदपूर गावात विहिरींनी तळ गाठला असल्याने भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. कालव्यांना पाणी वाटप करणाऱ्या जलकुंभात पाणी नसल्याने संकट ओढवले आहे. या जलकुंभात पाण्याची साठवणुक करण्यासाठी एक मिटरने जलाशयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

One meter water meter of the Chandrapur reservoir | चांदपूर जलाशयाचा एक मीटरने पाण्याचा विसर्ग

चांदपूर जलाशयाचा एक मीटरने पाण्याचा विसर्ग

googlenewsNext
ठळक मुद्देपाणीटंचाई: पाणी सोडण्यासाठी आमदारांचे पत्र, जलकुंभात साठवणूक करणार

रंजीत चिंचखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : चांदपूर गावात विहिरींनी तळ गाठला असल्याने भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. कालव्यांना पाणी वाटप करणाऱ्या जलकुंभात पाणी नसल्याने संकट ओढवले आहे. या जलकुंभात पाण्याची साठवणुक करण्यासाठी एक मिटरने जलाशयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.
चांदपूर गावात असणाºया विहिरी एप्रिल महिन्यातच कोरड्या पडल्या आहेत. जलकुंभाशेजारी असणारा सौर उर्जेवरील पंपगृह बंद पडला आहे. यामुळे पाणी टंचाईच्या संकटात भर पडली आहे. या जलकुंभातून गावकरी, जागृत हनुमान देवस्थानात दाखल होणारे भाविक तथा वन विभागाचे नर्सरीला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु टाकीतील पाणी आटल्याने नर्सरीतील कोट्यवधींचे रोपवन कोमेजण्याच्या मार्गावर आहे. यामुळे जलाशयाच्या गावातच पाण्याचा गंभीर संकट निर्माण झाला आहे. जलाशयाचे पाणी विसर्ग करण्याचे अधिकार पाटबंधारे विभागाला आहेत. परंतु पाण्याचा विसर्ग करतांना जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेतली जात आहे. यंदा उन्हाळी धान पिकांना पाण्याचे वाटप नाकारण्यात आले आहे. यामुळे जलाशयात १८ फुट पाण्याची शिल्लक साठवणूक आहे. या पाण्याचा उपयोग आता नागरिकांना पिण्याच्या कार्याकरिता येणार आहे. चांदपूर गावात निर्माण झालेली पाणी टंचाई निवारण्यासाठी आमदार चरण वाघमारे यांनी पाटबंधारे विभागाला पत्र दिले आहे.
याशिवाय सरपंच उर्मिला हेमराज लांजे आणि वन विभागाने पत्रातून पाणी सोडण्याचे पत्र दिले. चादंपूर जलाशयाचे एक मीटरने दरवाजा उघडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. विसर्ग होणारे पाणी टाकीत साठवणूक केले जाणार आहे. या पाण्याचे शुल्क तिन्ही विभागाकडून घेतले जाणार आहे. ग्रामपंचायत, देवस्थान आणि वन विभाग यांचेकडून राशी वसुली केली जाणार आहे. या पाण्याची वसुली ७० हजार रुपयांचे घरात असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येकी २२ हजार रुपये अशी वसुली येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाण्याचे विभागणी अमंलबजावणी सुरु करण्यात आली आहे.

चांदपूर गावात विहिरी आटल्या असल्याने जलाशयाचे पाणी सोडण्याचे पत्र दिले आहे. निधी प्राप्त होताच पाण्याची राशी दिली जाईल.
- उर्मिला लंजे,
सरपंच, चांदपूर
जलाशयाचे पाणी जलकुंभात विसर्ग करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. या पाण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यात आला आहे. विसर्गानुसार शुल्काची आकारणी करण्यात येईल.
- एन. जे. मिरत,
शाखा अभियंता, सिहोरा

बावनथडी, वैनगंगा नद्यांचे पात्र आटले
सिहोरा परिसरातील बावनथडी नदीचे पात्र पुर्णत: आटले असल्याने परिसरातील तथा मध्यप्रदेशातील नद्यांचे काठावरील गावात पाणी टंचाईची झळ सुरु झाली आहे. या नदी पात्रात राजीव सागर धरणाचे पाणी सोडण्याची मागणी सुरु झाली आहे. वैनगंगा नदीवर धरण असले तरी या धरणात अल्प जलसाठा आहे. यामुळे नळयोजना अडचणीत आलेल्या आहेत. शेतशिवारात असणाऱ्या विहिरींची पातळी खोलवर गेली असल्याने उन्हाळी धान पिकांना पाणी वाटप करणे शेतकऱ्यांना जीकरीचे ठरत आहे. पिण्याचे पाणी तथा शेती सिंचित करण्यासाठी थ्री फेज वीज पुरवठा १६ तासांचे करण्याची मागणी गावात नागरिक करित आहेत.

Web Title: One meter water meter of the Chandrapur reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.