शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

निविदा स्वीकारण्याच्या दिवशी कार्यालय बंद

By admin | Updated: October 18, 2015 00:18 IST

ग्राम पंचायत स्तरावर होणाऱ्या कामात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी शासनाने ई-निविदा प्रक्रिया सुरु केली. पण प्रत्येक कामात वरच्या कमाईत...

वरठी : ग्राम पंचायत स्तरावर होणाऱ्या कामात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी शासनाने ई-निविदा प्रक्रिया सुरु केली. पण प्रत्येक कामात वरच्या कमाईत पटाईत कर्मचाऱ्यानी यातही भ्रष्टाचार करण्याची शक्कल शोधुन काढली. ई- निविदेची हार्ड कॉपी स्विकारण्याच्या शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत कार्यालय बंद ठेवण्यात आले. कर्मचाऱ्याला निविदा स्विकारू नये, असे आदेश देवून हेतुपुरस्सर निविदा फेटाळण्यात आली. याबाबद निविदाधारक महावीर ट्रेडिंग कंपनीने खंड विकास अधिकाऱ्याकडे दाद मागीतली आहे. सदर प्रकरण तालुक्यातील कुशारी ग्रामपंचायत येथे घडले. तालुक्यातील कुशारी ग्राम पंचायतला सर्व योजनांच्या अंतर्गत विविध बाधंकाम कामाकरीता साहित्य पुरवण्याबाबद ई- निविदा काढण्यात आली. ई -निविदानुसार इच्छुक निविदा पुरवठा धारकास ३ आॅक्टोंबर पासून १२ आॅक्टोंबर दुपारी ३ वाजतापर्यत कोऱ्या निविदा डाऊनलोड करायच्या होत्या. आॅनलाईन निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर १२ आक्टोंबरला सायंकाळी ५ वाजतापर्यत ई निविदेची हार्ड कॉपी ग्राम पंचायत कार्यालयात जमा करायची होती. यासोबत नापरतावा एक हजार रुपयांचा डिमांड ड्राप द्यावयाची होती. ई निविदेनुसार वरठी येथील महाविर ट्रेडींग कंपनीने सर्व कागदपत्रांची पुर्तता करून ई निविदा आॅनलाईन सादर केले. वेळापत्रकात ठरवून दिल्याप्रमाणे १२ आक्टोंबर ला हार्ड कॉपी ग्रामपंचायत कुशारी येथे पाठवण्यात आले. पण कार्यालय बंद होते. प्रतीक्षा करूनही कार्यालय न उघडल्यामुळे निविदाधारकाने गावात चौकशी करून सरपंच व शिपायाांचे घर गाठले व निविदा घेण्यास सांगितले. पण ग्राम सेवकाने निविदा स्विकारण्यास मज्जाव केल्याचे शिपायाने सांगितले. या सदर्भात चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी तक्रारीच्या माध्यमातून केली आहे. (वार्ताहर)