शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

बुद्धांच्या अस्थिदर्शनाला उसळली गर्दी

By admin | Updated: October 18, 2015 00:15 IST

संपूर्ण विश्वाला शांती अहिंसेची शिकवण देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र सोनेरी अस्थिधातू कलशाचे वैशाली नगर सदधम्म बुद्ध विहारात...

स्वागतासाठी रांगा : वैशालीनगर विहारात कलशाचे प्रथम आगमन भंडारा : संपूर्ण विश्वाला शांती अहिंसेची शिकवण देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पवित्र सोनेरी अस्थिधातू कलशाचे वैशाली नगर सदधम्म बुद्ध विहारात प्रथम आगमन होताच हजारो उपासक उपासिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन वंदन करीत हर्षाेउल्हासात स्वागत केले.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भारतात साजरी होत असलेल्या १२५ व्या जयंती दिनाच्या पर्वावर व नागपूर येथे विजयादशमी दिनी संपन्न झालेल्या ६० व्या धम्मचक्र प्रवर्तनानिमित्त श्रीलंका सरकार द्वारा बुद्धांच्या अस्थिधातुचे भारतात नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले होते. याची चाहूल लागताच सदधम्म बुद्ध विहाराच्या आयोजकांनी व वैशाली नगर वासियांनी या संधीचे सोने केले. भंडाऱ्यातील वैशाली नगर बुद्ध विहारात अस्थिकलश आणून हजारो बांधवांना दर्शनार्थ उपलब्ध करून दिला.भंडाऱ्यात आगमन होताच येथील त्रिमुर्ती चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून या अस्थिधम्मरथाचे मोटारसायकल रॅलीने भगवान बुद्धांचा जयजयकार करीत वैशाली नगर गेटवर आगमन झाले. येथे विहार समितीचे महादेव मेश्राम, म.वा. दहिवले, वामन मेश्राम, अ‍ॅड. डी.के. वानखेडे, प्रा. रमेश जांगळे, प्रा. रवी वाहाने, पी.डी. मेश्राम आदींनी पवित्र अस्थिधातु कलशाचे स्वागत केले. लगेच गेटपासून विहारापर्यंत शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या उपासिकांनी रांगेत अस्थिकलशावर पुष्पवृष्टी केली. अशाप्रकारे धम्मरथ व त्यावरील पवित्र अस्थिधातुकलशाचे विहारात आगमन झाले. विहारातील सदधम्म मंचावर श्रीलंकेचे भंते वास्तडोये महिंदावत्स महानायके, भंते ओकांदे आनंदथेरो भदंत लोगवाक, भंते डांगामेह ट्युएन व्हीएतनाम, बंधुला विरादर्शने श्रीलंका, भारतीय बौद्धमहासभा विदर्भ प्रदेशचे सचिव अनिल मेश्राम, बुद्धा स्पिरीच्युअल पार्क सिहोरा (कन्हान)चे संयोजक नितीन गजभिये आदी उपस्थित होते.सकाळपासून बौद्ध विहार व समोरील प्रांगणात हजारोच्या संख्येने जनसमुदाय एकत्रित झाला होता. श्रीलंकेचे भंते वास्तडोये महिंदावत्स महानायक यांनी विहारातील भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. बुद्धविहार व परिसरातील हजारो जनसमुदयास त्रिशरण व पंचशील देऊन सर्वांच्या कल्याणाचे मंगलकामना केली. ते म्हणाले, भगवंताच्या पवित्र अस्थिधातुचा कलश हा केवळ विहारात अथवा त्यालगत परिसरात ठेवण्याची पुर्वपरंपरा आहे. येथील जनतेने हा कलश सदधम्म बौद्ध विहार वैशाली नगर भंडारा येथे आणून पवित्र कार्य केले आहे. असेच धम्म कार्य करीत राहा, असा उपदेश दिला. याप्रसंगी वैशाली नगर म्हाडा कॉलनी, तुलसी नगर, फ्रेन्डस कॉलनी व गावखेड्यातून आलेल्या सुमारे चार हजार जनतेने दर्शन घेतले. यावेळी कुशीनारा येथे बुद्धाच्या परिनिर्वाणाचे विविध कटआउटस, शुभ्र वस्त्र परिधान केलेले बौद्ध बांधव, रांगेत उभे राहून शांततेत अस्थिधातुचे दर्शन हे विशेष आकर्षण होते. कार्यक्रमाकरीता विहार अध्यक्ष महादेव मेश्राम, सचिव म.वा. दहिवले, वामन मेश्राम, अ‍ॅड. डी.के. वानखेडे, प्रा. रमेश जांगळे, प्रा. रवी वाहाने, प्रा. पी.डी. मेश्राम, सुरेंद्र सुखदेवे, चंद्रमणी मेश्राम, रविंद्र ढोके, पी.के. ठवरे, हरीदास चंद्रिकापुरे, प्रमोद बोरकर, विनोद चवरे, हरीचंद्र रामटेके, बंटी हुमने, शंकर बोरकर, सलीम पठाण, सतीश मेश्राम तसेच भद्रा कात्यायन महिला मंडळाच्या शकुंतला हुमने, कल्पना ढोके, विशाखा वाहाने, सुशिला खोब्रागडे, कविता सरादे, मिनाक्षी वाहाने, जोत्सना जांगळे, शकुंतला गजभिये, आदिंनी सहकार्य केले. प्रास्ताविक म.वा. दहिवले संचालन प्रा. रमेश जांगळे प्रा. रवी वाहाने यांनी आभार मानले. (नगर प्रतिनिधी)