रोजगार हमीची कामे व मजुरांची संख्या घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:36 AM2021-04-09T04:36:52+5:302021-04-09T04:36:52+5:30

कोरोनाने आता गाव खेड्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे रोजगार हमीची कामे मोठ्या संख्येने सुरू झाली नाहीत. मोहाडी तालुक्यातील ...

The number of guaranteed jobs and laborers decreased | रोजगार हमीची कामे व मजुरांची संख्या घसरली

रोजगार हमीची कामे व मजुरांची संख्या घसरली

Next

कोरोनाने आता गाव खेड्यात प्रवेश केला आहे. त्यामुळे रोजगार हमीची कामे मोठ्या संख्येने सुरू झाली नाहीत. मोहाडी तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींमध्ये वृक्ष संगोपनाची ४ कामे, पाटबंधारेचे कालव्याचे १ काम, मैदान सपाटीकरण, मजगी, गुरांची शेड १४ कामे, पांदन रस्ते ३ कामे, घरकुल १०३ कामे अशी १२५ कामे सुरू आहेत. त्यात

केवळ ८७० मजूर कामावर होते. उलट ६ एप्रिल रोजी १६६ कामे सुरू होती. त्यावर १९४० मजूर कामावर होते. दुसऱ्याच दिवशी ४१ कामे कमी व १०७० मजूर कमी झाले आहेत. कामे सुरू करताना मजुरांची कोविड चाचणी व लसीकरण प्रभावीपणे होत नसल्याने रोजगार हमी कामाच्या गतीवर परिणाम होत आहे.

Web Title: The number of guaranteed jobs and laborers decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.