शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

आता जंगल सफारी करण्यासाठी करू शकता ऑनलाईन बुकिंग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:15 IST

कोका वन्यजीव अभयारण्य : ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंतच्या पाच महिन्यांत झाली लाखाची कमाई

युवराज गोमासे लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : निसर्गाची मुक्तहस्ते उधळण झालेल्या कोका तन्यजीव अभयारण्यात १ ऑक्टोबरपासून जंगल सफारीला सुरुवात झाली. यास पर्यटक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विद्यार्थ्यांसह बाहेरील पर्यटक जंगल सफारीचा आनंद लुटत आहेत. सफारीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा आहेत, परंतु पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंगकडे पाठ फिरविली असून, ऑफलाइन स्पॉट बुकिंगला पसंती दर्शविली आहे. पाच महिन्यांत ४८३ पर्यटकांनी ऑफलाइन, तर केवळ २६ पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग केली. यातून प्रशासनाला लाखाची कमाई झाली आहे.

२०१५ मध्ये उदयास आलेला कोका वन्यजीव अभयारण्य १० हजार १३ हेक्टरमध्ये विस्तारला आहे. पर्यटकांना वन्यजीवांसह निसर्गाचा सहवास लाभावा, यासाठी तलाव, नाले व डॉगर टेकड्यांसह घनदाट जंगलातून सफारीचे मार्ग तयार करण्यात आले. सफारीसाठी सुमारे ५२ किमीचे रस्ते तयार करण्यात आले आहेत. अभयारण्यात १ ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यतच्या पाच महिन्यांत पर्यटनातून १ लाख १५ हजार ५०० रुपयांची कमाई प्रशासनाला झाली.

विद्यार्थ्यांसह ४८३ पर्यटकांनी 66 घेतला निसर्गानुभवकोका वन्यजीव अभयारण्यात ऑक्टोंबर ते फेब्रुवारी या कालावधीत ४३९ पर्यटकांनी वन्यजीवांसह निसर्गानुभव घेतला. यात ४४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सुमारे २० जिप्सीतून घडलेल्या जंगल सफारीमुळे गाइड व जिप्सी चालकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये सर्वाधिक पर्यटकांच्या भेटीपर्यटकांनी हिवाळ्याला सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर महिन्यात १५२ पर्यटकांनी भेट दिली, तर डिसेंबर महिन्यात १४८ पर्यटकांनी निसर्ग भ्रमंतीचा आनंद लुटला.

उन्हाळी जंगल सफारीला मिळतोय प्रतिसादवन्यजीव पाहण्याची हौस अनेक पर्यटकांना असते. त्यामुळे अशा पर्यटकांकडून उन्हाळी पर्यटनाला गर्दी होते. उन्हाळ्यात पानगळ होऊन जंगल निष्पर्ण होते. जंगलात दूरवर असलेले प्राणी सहज दिसतात. दरवर्षी कोका अभयारण्यात उन्हाळी पर्यटनात वाढ होत असते. यंदाही एप्रिलपासून पर्यटनात वाढ होण्याचा अंदाज अभयारण्य प्रशासनाकडून व्यक्त होत आहे. त्या दृष्टीने तयारी सुरु आहे.

पाच महिन्यांतील ऑफलाइन पर्यटकांची व वाहन संख्यामहिना              पर्यटक             विद्यार्थी          वाहन              उत्पन्नऑक्टोबर             ४०                      ४                     ६                  ६,५००नोव्हेंबर               १४१                    ११                    ३०                 ३८,७५०डिसेंबर                ११९                   २४                    २७                ३५,२५०जानेवारी               ८९                     ४                     १९                 २१,८७५फेब्रुवारी               ५०                     १                      १०                 १३,१२५एकूण                  ४३९                   ४४                    ९०                १,१५,५००

"उन्हाळी पर्यटनासाठी कोका वन्यजीव अभयारण्य प्रशासन सज्ज आहे. ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा सुरू आहे. जिप्सी, गाइड, हॉटेल व स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत आहे."- तेजस सूर्यवंशी, वनपरिक्षेत्राधिकारी, अभयारण्य कोका.

 

टॅग्स :bhandara-acभंडारा