शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

आता फ्लॅटमध्ये पेटवायच्या का चुली, गॅस दरवाढीने गृहिणी संतापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:42 IST

भंडारा : गॅस सिलिंडरचे दर बुधवारी आणखी २५ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. यामुळे आता घरगुती वापराचा १४ किलोचा सिलिंडर ...

भंडारा : गॅस सिलिंडरचे दर बुधवारी आणखी २५ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. यामुळे आता घरगुती वापराचा १४ किलोचा सिलिंडर ९४६ रुपयांचा झाला असून सातत्याने होत असलेली दरवाढ बघता गृहिणी चांगल्याच संतापल्या आहेत. पेट्रोल-डिझेलसोबतच अन्य वस्तूंची वाढत चाललेली महागाई आता सर्वसामान्यांना चांगलीच होरपळत आहे.

अशात गॅस सिलिंडर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायची पाळी गृहिणींवर आली आहे. विशेष म्हणजे, सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या काय, असा सवाल संतापलेल्या गृहिणी करीत आहेत. मागील वर्षभरापासून सातत्याने महागाई वाढत चालली असून सोबतच गॅस सिलिंडरचे दर त्यामुळे भरमसाट वाढले आहेत. सिलिंडर आता हजार रुपयांच्या घरातच पोहोचल्याने सर्वसामान्यांनी सिलिंडर कसा खरेदी करायचा, असा प्रश्न पडत आहे. महागाई नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.

बॉक्स

सबसिडी किती भेटते रे भाऊ...

घरगुती वापराच्या सिलिंडरवर ग्राहकांना शासनाकडून ४६ रुपये सबसिडी दिली जाते. मात्र या तुलनेत सिलिंडर ९३० रुपयांवर पोहोचले होते. आता बुधवारी त्यात आणखी २५ रुपयांची वाढ झाली असून सिलिंडर ९४६ रुपयांवर पोहोचले आहे. म्हणजेच सिलिंडरचे दर आवाक्याबाहेर जात असतानाच त्यावर दिली जाणारी सबसिडी मात्र अत्यंत मोजकीच आहे.

बॉक्स

व्यावसायिक सिलिंडरही महागले

घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर भडकले असतानाच व्यावसायिक सिलिंडरचे दरसुद्धा वाढविण्यात आले आहेत. सध्या १,७९७ रुपयांचा असलेला व्यावसायिक सिलिंडर ७० रुपयांनी महागला असून त्याची किंमत आता १,८६७ रुपये झाली आहे. परिणामी एकीकडे गृहिणी संतापलेल्या असतानाच व्यापारीही सिलिंडर दरवाढीमुळे चांगलेच त्रस्त झाले असून त्यांच्यातही रोष दिसून येत आहे.

बॉक्स

दर महिन्याला नवा उच्चांक

दिनांक सिलिंडरचे दर

१ डिसेंबर - ६६४

१ जानेवारी - ६६४

१ फेब्रुवारी - ७६४

१ मार्च - ७६४

१ एप्रिल - ७८९

१ मे - ८२०

१ जून - ८२०

१ जुलै - ८९४

१ ऑगस्ट - ९२१

१ सप्टेंबर - ९४६

कोट

लॉकडाऊनने अगोदरच सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. त्यात सातत्याने महागाई वाढत असून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ झाल्याने आता सिलिंडर ९५५ रुपयांना मिळणार आहे. सततच्या महागाईने आता घर चालविणे कठीण झाले आहे. शासनाने महागाई नियंत्रणात आणून सिलिंडरचे दरही कमी करावे.

- प्रियंका दुधबरैय्या (गृहिणी)

कोट

उज्ज्वल भविष्यासाठी सुरू केलेली योजना सिलिंडरच्या सततच्या दरवाढीने मातीमोल ठरली आहे. सिलिंडरचे दर ९५५ रुपये झाले असून ते आता आवाक्याबाहेर गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. शासनाने ही दरवाढ नियंत्रणात आणावी व सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार नाही याची दक्षता घ्यावी.

- प्रियंका सार्वे (गृहिणी)