शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
2
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
3
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
4
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
5
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
6
"८-९ महिन्यापूर्वी उदय सामंत यांच्यासह एकनाथ शिंदे यांचे २० आमदार फुटत होते, पण...!"; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा मोठा गौप्यस्फोट
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
8
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
9
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
10
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
12
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
13
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
14
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
15
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
16
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
17
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
18
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
19
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

आता फ्लॅटमध्ये पेटवायच्या का चुली, गॅस दरवाढीने गृहिणी संतापल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 05:00 IST

सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या काय, असा सवाल संतापलेल्या गृहिणी करीत आहेत. वर्षभरापासून सातत्याने महागाई वाढत चालली असून सोबतच गॅस सिलिंडरचे दर त्यामुळे भरमसाट वाढले आहेत. सिलिंडर आता हजार रुपयांच्या घरातच पोहोचल्याने सर्वसामान्यांनी सिलिंडर कसा खरेदी करायचा, असा प्रश्न पडत आहे.

देवानंद नंदेश्वरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गॅस सिलिंडरचे दर बुधवारी आणखी २५ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. यामुळे आता घरगुती वापराचा १४ किलोचा सिलिंडर ९४६ रुपयांचा झाला असून सातत्याने होत असलेली दरवाढ बघता गृहिणी चांगल्याच संतापल्या आहेत. पेट्रोल-डिझेलसोबतच अन्य वस्तूंची वाढत चाललेली महागाई आता सर्वसामान्यांना चांगलीच होरपळत आहे.अशात गॅस सिलिंडर भडकल्याने आता गॅस सोडून चुलीवर स्वयंपाक करायची पाळी गृहिणींवर आली आहे. विशेष म्हणजे, सिलिंडरच्या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनी पुन्हा चूल पेटविण्यास सुरुवात केली आहे. मात्र शहरात ते शक्य नसल्याने आता फ्लॅटमध्ये चुली पेटवायच्या काय, असा सवाल संतापलेल्या गृहिणी करीत आहेत. वर्षभरापासून सातत्याने महागाई वाढत चालली असून सोबतच गॅस सिलिंडरचे दर त्यामुळे भरमसाट वाढले आहेत. सिलिंडर आता हजार रुपयांच्या घरातच पोहोचल्याने सर्वसामान्यांनी सिलिंडर कसा खरेदी करायचा, असा प्रश्न पडत आहे. महागाई नियंत्रणात आणणे गरजेचे आहे.

 सबसिडी किती भेटते रे भाऊ 

- घरगुती वापराच्या सिलिंडरवर ग्राहकांना शासनाकडून ४६ रूपये सबसिडी दिली जाते. मात्र या तुलनेत सिलिंडर ९३० रुपयांवर पोहचले होते. आता बुधवारी त्यात आणखी २५ रूपयांची वाढ झाली असून सिलिंडर ९४६ रूपयांवर पोहचले आहे. म्हणजेच, सिलिंडरचे दर आवाक्याबाहेर जात असतानाच त्यावर दिली जाणारी सबसिडी मात्र अत्यंत मोजकीच आहे. 

व्यावसायिक सिलिंडरही महागले - घरगुती वापराच्या सिलिंडरचे दर भडकले असतानाच व्यावसायिक सिलिंडरचे दर सुद्धा वाढविण्यात आले आहेत. सध्या १,७९७ रूपयांचा असलेला व्यावसायिक सिलिंडर ७० रूपयांनी महागला असून त्याची किंमत आता १,८६७ रूपये झाली आहे. परिणामी एकीकडे गृहिणी संतापलेल्या असतानाच व्यापारीही सिलिंडर दरवाढीमुळे चांगलेच त्रस्त झाले असून त्यांच्यातही रोष दिसून येत आहे. 

महिन्याचे गणित कोलमडले लॉकडाऊनने अगोदरच सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. त्यात सातत्याने महागाई वाढत असून घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची दरवाढ झाल्याने आता सिलिंडर ९५५ रुपयांना मिळणार आहे. सततच्या महागाईने आता घर चालविणे कठीण झाले आहे. शासनाने महागाई नियंत्रणात आणून सिलिंडरचे दरही कमी करावे. - प्रियंका दुधबरैय्या (गृहिणी)

उज्ज्वल भविष्यासाठी सुरू केलेली योजना सिलिंडरच्या सततच्या दरवाढीने मातीमोल ठरली आहे. सिलिंडरचे दर ९५५ रूपये झाले असून ते आता आवाक्याबाहेर गेले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. करिता शासनाने ही दरवाढ नियंत्रणात आणावी व सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार नाही याची दक्षता घ्यावी. - प्रियंका सार्वे (गृहिणी) 

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर