शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

आता कर्मचारी राहतील ‘नजरेत’

By admin | Updated: January 6, 2015 22:53 IST

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळा ठरवून दिल्या आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांकडून नियम पायदळी तुडविल्या जातात. याबाबत, लोकमतने ‘स्टिंग आॅपरेशन’ करून आज मंगळवारला

सीईओंनी घेतली दखल : सकाळी चहाटपरीवर शुकशुकाटभंडारा : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयीन वेळा ठरवून दिल्या आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांकडून नियम पायदळी तुडविल्या जातात. याबाबत, लोकमतने ‘स्टिंग आॅपरेशन’ करून आज मंगळवारला ‘काटा दहावर तरीही शुकशुकाट’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. वृत्ताची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेऊन बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या दालनात कर्मचारी नियुक्त केला असून त्यांच्यावर साडेतीन वाजेपर्यंत निगरानी ठेवणार आहे. त्यामुळे कर्मचारी धास्तावले आहेत.जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी शासकीय नियमावली बनविण्यात आलेली आहे. हे सर्व कर्मचारी सकाळी १० वाजता कार्यालयात उपस्थित राहून दुपारी लंच बे्रक नंतर सायंकाळी ५.४५ पर्यंत कार्यालयीन कामात उपस्थित रहावे, असे आदेश आहेत. मात्र काही कर्मचारी वगळता अनेक कर्मचारी केवळ वेळमारून नेत दिवस घालवितात. तर कित्येकदा हे कर्मचारी चहाटपरीवरच भेटतात, अशी पुष्टी जोडण्यात येत होती. यामुळे कामासाठी आलेल्यांना कर्मचाऱ्यांची ताटकळत वाट बघत रहावी लागते. भंडारा जिल्हा परिषद कार्यालय, तुमसर, मोहाडी व लाखनी येथील पंचायत समिती व तहसील कार्यालयात स्टिंग आॅपरेशन केले. यात कर्मचारी हे सकाळी १० ला कार्यालयात उपस्थित होताना बायोमॅट्रीक मशिनवर हजेरी लावल्यानंतर कक्षात न बसता चहाटपरीवर किंवा कार्यालयाबाहेर जात होते. यात ते तासभर कार्यालयीन काम करत नसल्याचे दिसून आले. तर काही कर्मचारी हे मुख्यालयी राहत असल्याचे प्रमाणपत्र जोडत असले तरी नागपूर किंवा भंडारा येथून नित्याने जाणे येणे करणारे कर्मचारीही वेळेत कार्यालयात उपस्थित होत नसल्याचे निदर्शनास आले. या वृताने कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. भंडारा जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी सकाळी चहा टपरींवर दिसून येत होते. मात्र आज सकाळी परिसरातील चहा टपऱ्या कर्मचाऱ्यांविना दिसून आल्या. त्यामुळे या परिसरात शुकशुकाट दिसून आला. या वृत्ताची मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांनी दखल घेतली. कार्यालयाबाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी त्यांनी इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारात त्याची नोंदणी करण्यासाठी एक कर्मचारी बसविला आहे. तो दुपारी १२.३० पर्यंत नोंदणी करायचा. आजपासून हा कर्मचारी बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर दुपारी ३.३० वाजेपर्यंत नजर ठेवून त्याची रजिस्टरमध्ये नोंदणी करणार आहे. याखेरीज ज्या विभागात जास्त कर्मचारी आहेत, अशांवर निगराणी ठेवण्यासाठी त्या कक्षाबाहेर स्वतंत्र रजिस्टर मध्ये नोंदणी करण्यासाठी कर्मचारी बसविणार आहेत. शिक्षण विभागातील कक्षासमोर अशा पद्धतीचा प्रकार सुरु झाला असून आज एक कर्मचारी बाहेर जाणाऱ्या येणाऱ्यांची नोंदणी करताना आढळून आला. (शहर प्रतिनिधी)