शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आता लेकीची चिंता मिटवा, सुकन्या समृद्धी योजनेत पैसे गुंतवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 14:35 IST

पोस्ट विभागाची योजना : मुलींचे भविष्य होते सुरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मुलींच्या भविष्याची चिंता प्रत्येक पाल्याला सतावत असते. मुलींचे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, लग्न अशी अनेक कर्तव्ये पार पाडण्यासाठी पालकांना मोठी आर्थिक तरतूद करावी लागते. या चिंतेतून पालकांना मुक्त करण्यासाठी पोस्ट कार्यालयाने सुकन्या समृद्धी योजना यापूर्वीच सुरू केली आहे. जिल्ह्यात या योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एक लाखाहून अधिक मुलींची खाती उघडण्यात आली आहेत. मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुकन्या समृद्धी योजना लाभदायक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीच्या नावे टपाल कार्यालयात बचत खाते काढावे लागते. हे खाते २१ वर्षांनंतर परिपक्व होते. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर जमा झालेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम शिक्षणासाठी काढता येते. तर मुलीला २१ वर्षे झाल्यानंतर संपूर्ण रक्कम काढता येते. या योजनेच्या लाभासाठी पोस्ट कार्यालयात अथवा बँकेत जाऊन मुलींच्या नावे खाते उघडता येते. खाते उघडताना मुलीचे जन्म प्रमाणपत्र, मुलगी व पालकांचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, दस्तऐवज आदी कागदपत्रांची आवश्यकता असते. 

सुकन्या समृद्धी योजनेचे वैशिष्ट्यमुलीच्या नावे पोस्ट कार्यालयात बचत खाते उघडावे लागते. हे खाते २१ वर्षांनंतर परिपक्च होते. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर जमा रकमेतून ५० टक्के रक्कम तातडीने काढता येते.

मुलीच्या दहा वर्षांआधी काढा खातेपोस्ट विभागाची ही एक बचत योजना आहे. मुलगी १० वर्षाची होईपर्यंतच तिच्या नावे खाते उघडता येते. खाते उघडल्यानंतर मुलीच्या नावे मासिक किमान २५० तर कमाल १.५० लाखापर्यंत गुंतवणूक करता येते.

लेकीचे भविष्य होते उज्ज्वल मुलगी १८ वर्षाची झाली की पालकांना तिच्या भविष्याची चिंता लागते. मुलीला डॉक्टर, वकील, उच्च अधिकारी बनविण्याबरोबरच शिक्षणासाठी परदेशी शिक्षणासाठी मोठी तरतूद करावी लागते. अशा पालकांचा सुकन्या समृद्धी योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

"जिल्ह्यात पोस्ट कार्यालयामार्फत सुकन्या समृद्धी योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. या योजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातूनही मोठा प्रतिसाद मिळत आहे."- शंकर निंबार्ते, जिल्हा पोस्ट मास्तर, भंडारा

टॅग्स :government schemeसरकारी योजनाbhandara-acभंडारा