लाखनी : घरगुती वापराचे गॅस सिलिंडर येत्या महिन्यात गॅस सिलिंडरधारकांना पुन्हा अनुदानाच्या रक्कमेसह द्यावे लागणाऱ्या केंद्र शासनाच्या धोरणाने गॅस जोडणीधारकात संतापाचे वातावरण आहे. गॅस जोडणीधारकांना या सरकारने लवकरच वाईट दिवस दाखविल्याची प्रतिक्रिया गॅसधारक व्यक्त करू लागले आहे. जेमतेम परिस्थितीत गॅसचा वापर करणारे वाईट दिवस आल्याची प्रतिक्रिया गॅसधारक व्यक्त करू लागले आहेत.हजारो गॅसधारकांना गॅस सिलिंडर पुर्ण दराने विकत घेतल्यानंतर अनुदान, बँक खात्यात जमा होण्याची वाट पाहावी लागणार असल्याने गॅस सिलिंडरची पूर्ण रक्कम जमा करताना गॅसधारकांची तारांबळ उडणार आहे. येत्या महिन्यापासून घरगुती सिलिंडरचे अनुदान बँक खात्यात जमा होणार असल्याने ग्राहकांना पूर्ण रक्कम पहिल्यांदाच देवून सिलिंडर विकत घ्यावे लागणार आहे. केंद्रात आघाडी शासन असताना शासनाने सिलिंडर अनुदानाच्या रक्कमेसह विकत घेण्याचे व त्यावरील अनुदान बँकेच्या खात्यात जमा करण्याचे धोरण राबविले होते. मात्र याची तीव्र प्रतिक्रिया गॅस जोडणीधारकात उमटल्याने शासनाने ती योजना मागे घेत अनुदानासह दराने गॅस सिलिंडर विकत देण्याची योजना सुरू केली होती. (शहर प्रतिनिधी)
आता गॅसधारकांना पूर्ण दराने सिलिंडर
By admin | Updated: November 1, 2014 00:43 IST