शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

आता जिल्हा परिषद सभापतींसाठी मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

विकास फाउंडेशन या भाजपाच्या फुटीर गटाला उपाध्यक्षपद मिळाल्याने आता त्यांना सभापतीपद मिळणार की नाही, त्यांच्यासोबत असलेल्या एका अपक्षाला सभापतीपदी दिले जाणार काय अशी चर्चा आहे. काँग्रेसमध्ये मात्र अनेक जण सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाव असलेले; परंतु ऐनवेळी दुसरेच नाव पुढे आल्याने नाराज झालेल्या सदस्याची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे. काहीही असले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीएवढी सभापतीपदासाठीही आता काँग्रेस पक्षामध्ये रस्सीखेच होणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची निवड झाल्यानंतर आता सभापतीपदी कुणाची वर्णी लागते याची उत्सुकता लागली आहे. काँग्रेस आणि भाजपचा बंडखोर विकास फाउंडेशन यांच्यात सभापतीपदासाठी तडजोड झाली असून, त्यांना एक सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे. येत्या १९ मे रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात ४ विषय समित्यांच्या सभापतींची निवड होणार आहे.काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर करीत भाजपाच्या एका गटाला सोबत घेत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविले, तर भाजपा बंडखोर गटाला उपाध्यक्षपद दिले. नाट्यमय घडामोडीनंतर अध्यक्षपदी काँग्रेसचे गंगाधर जिभकाटे, तर उपाध्यक्षपदी भाजपचे बंडखोर संदीप ताले विराजमान झाले. आता सभापतीपदासाठी कुणाची नावे पुढे येणार याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे २१ सदस्य जिल्हा परिषदेच्या सभागृहात आहेत, तर भाजपमधून बंडखोरी करीत आलेले पाच सदस्य आणि एक अपक्ष सदस्य आहे. यातून आता सभापतींची निवड केली जाणार आहे.विकास फाउंडेशन या भाजपाच्या फुटीर गटाला उपाध्यक्षपद मिळाल्याने आता त्यांना सभापतीपद मिळणार की नाही, त्यांच्यासोबत असलेल्या एका अपक्षाला सभापतीपदी दिले जाणार काय अशी चर्चा आहे. काँग्रेसमध्ये मात्र अनेक जण सभापतीपदासाठी इच्छुक आहेत. अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाव असलेले; परंतु ऐनवेळी दुसरेच नाव पुढे आल्याने नाराज झालेल्या सदस्याची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे. काहीही असले तरी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीएवढी सभापतीपदासाठीही आता काँग्रेस पक्षामध्ये रस्सीखेच होणार आहे. त्यातही महत्वाचे सभापतीपद मिळावे यासाठी मोर्चेबांधणी केली जात आहे.

१९ मे रोजी सभापतींची निवडणूक- जिल्हा परिषदेच्या विषय समिती पदाची निवडणूक १९ मे रोजी होत आहे. उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि उर्वरीत विषय समित्यांच्या दोन सभापतींची निवड होणार आहे. सकाळी १० वाजतापासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येतील. विशेष सभेची सुरुवात दुपारी २ वाजता होईल. त्यानंतर छाननी व उमेदवारी मागे घेण्याची प्रक्रिया २.३० पर्यंत होणार आहे. आवश्यकता असल्यास २.३० वाजता मतदान घेण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी निर्गमित केले आहे.

राष्ट्रवादीही दाखल करणार नामांकन- जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष - उपाध्यक्षांच्या निवडीत सत्तेपासून दूर राहिलेल्या राष्ट्रवादीनेही सभापतीपदासाठी नामांकन भरण्याची तयारी सुरू केली आहे. आता राष्ट्रवादी तर्फे कोण नामांकन दाखल करणार याची उत्सुकता आहे. परंतु बहुमत काँग्रेस आणि विकास फाउंडेशनकडे असल्याने राष्ट्रवादीचा सभापती होण्याची शक्यता दिसत नाही.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद