सुधारित आदेश धडकले : सेंदुरवाफा जिल्हा परिषद क्षेत्र साकोलीत विलीनसंजय साठवणे साकोली भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्याच्या नगरपंचायतीच्या कार्यवाहीवर तात्काळ स्थगीती आणून साकोली तालुक्याला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावा अशी शिफारस नगर विकास विभाग मुंबई यांनी केली असून तसे आदेश जिल्हाधिकारी भंडारा यांना प्राप्त झाले आहेत.या आदेशानुसार जिल्हा प्रशासन अधिकारी नगरविकास शाखा भंडारा यांनी यावेळी व सेंदूरवाफा ग्रामपंचायतीला पत्र पाठवून दोन्ही ग्रामपंचायतींना ठरावाची मुळ प्रत व स्वयस्पष्ठ अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेश निर्गमीत केले आहे. आदेशाची माहिती गावकऱ्यांना मिळताच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. साकोली ग्रामपंचायतचे रुपांतर नगर परिषदेत व्हावे, यासाठी काँग्रेसचे नेते माजी आमदार सेवक वाघाये यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. दि. १२ फेब्रुवारी रोजी साकोली नगरपंचायतीची घोषणा झाली. या घोषणेनंतर तात्काळ त्याच मध्यरात्रीपासून सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, साकोलीचे पंचायत समिती सदस्य मदन रामटेके, जिल्हा परिषद सदस्य गीता कापगते यांचे सदस्यत्व संपुष्टात आले होते व तेव्हापासून साकोलीचे तहसीलदार हे नगरपरिषदेचे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले. सध्या साकोलीचा कार्यभार हा नगरपंचायत म्हणून सुरु होता. भंडारा जिल्ह्यातील साकोली, लाखनी, लाखांदूर व मोहाडी या चारही नगरपंचायतीच्या निवडणुकीची तयारी सुरु होती. त्यामुळे सप्टेंबर किंवा आॅक्टोबर महिन्यात ही निवडणूक होणार आहे अशी चर्चा होती. त्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवार तयारीला लागले होते. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पद रद्द होणारसाकोली नगरपंचायतीची घोषणा झाली तेव्हा साकोली जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्यत्व संपुष्टात आले होते. जर साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद झाल्यास सेंदूरवाफा जिल्हापरिषद व पंचायत समिती सदस्यत्व संपुष्टात येऊ शकते. मात्र जिल्हा परिषद ही ५२ सदस्यांची असल्याने एक सदस्य कमी झाल्यास ५१ सदस्यतच राहतात. त्यामुळे हा प्रश्न संभ्रमात टाकणारा आहे.दोन स्वतंत्र इमारती तयारसाकोली व सेंदूरवाफा या दोन्ही ग्रामपंचायतच्या दोन भव्य दुमजली स्वतंत्र इमारती तयार असून या इमारतीमधून नगरपरिषदेचा कारभार सुरळीत चालू शकतो. हा दिवसेंदिवस साकोलीपेक्षा सेंदूरवाफा ग्रामपंचायतीची लोकसंख्या वाढत आहे हे विशेष. मंत्रालयात पाठपुरावासाकोली व सेंदूरवाफा या दोन्ही ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३० हजाराच्या वर असल्याने व एकमेकाला लागून असल्याने दोन वेगवेगळ्या नगरपंचायत बनविण्यापेक्षा साकोली, सेंदूरवाफा ही नगरपरिषद बनविण्यासंबंधी दोन्ही ग्रामपंचायतींनी जानेवारी महिन्यात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना निवेदन देण्यात आला होता. यानंतर या नगरपरिषदेसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन खेडीकर, माजी उपसरपंच किशोर पोगडे, सामाजिक कार्यकर्ते बंडू बोरकर यांनी खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशीवार यांच्या सहकार्याने वारंवार मुंबईला जाऊन मंत्रालयात पाठपुरावा केला होता.
आता साकोलीत होणार नगर परिषद
By admin | Updated: August 13, 2015 01:27 IST