शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची राज्य सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 06:34 IST

जाहीर केल्याप्रमाणे भंडारा अग्निकांडाचा चौकशी अहवाल तीन दिवसांत म्हणजे आज, मंगळवारी सादर होण्याची शक्यता नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा/नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा अर्भकांच्या मृत्यूप्रकरणाची स्वयंस्फूर्तीने दखल घेत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने सोमवारी महाराष्ट्र सरकारला नोटीस जारी केली. राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांनी चार आठवड्यांत या घटनेचा तसेच राज्यभरातील रुग्णालयांच्या फायर ऑडिटचा अहवाल सादर करायचा आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मरण पावलेल्या बाळांच्या पालकांना प्रत्येकी दोन लाख रुपये सानुग्रह अनुदान घोषित केले. आगीतून वाचलेल्या बालकांच्या पालकांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येतील. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 

जाहीर केल्याप्रमाणे भंडारा अग्निकांडाचा चौकशी अहवाल तीन दिवसांत म्हणजे आज, मंगळवारी सादर होण्याची शक्यता नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सहा सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्याऐवजी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची नियुक्ती केल्यामुळे हा विलंब लागेल, असे सूत्रांनी सांगितले. यातील निष्कर्षाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

तान्हुल्यांच्या माता  मानसिक धक्क्यातअग्नितांडवात मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांच्या माता मानसिक धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्या ओल्या बाळंतिणी असल्यामुळे त्यांची नियमित तपासणी आणि समुपदेशन करण्याचे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी संबंधितांना दिले. ॲड. ठाकूर यांनी सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. प्रमोद खंडाते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुरसुंगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके उपस्थित होते. नंतर महिला बालकल्याण मंत्र्यांनी योगिता धुळसे (श्रीनगर) व वंदना सिडाम (रावणवाडी) यांचे त्यांच्या घरी जाऊन सांत्वन केले. 

‘लोकमत’च्या मोहिमेला राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे बळभंडारा अग्निकांडप्रकरणी राज्य सरकारला नोटीस जारी करताना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गेले तीन दिवस लोकमत चालवित असलेल्या मोहिमेचा उद्देश स्पष्टपणे उचलून धरला आहे. राज्याचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांनी या नोटिसीला चार आठवड्यांत उत्तर द्यायचे असून राज्यभरातील सरकारी रुग्णालयांमध्ये नियमित फायर ऑडिट झाले का, कोणत्या त्रुटी आढळल्या व त्या दूर करण्याच्या प्रक्रियेत दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली, ही माहिती सादर करण्याचे आयोगाचे आदेश आहेत. ही दुर्घटना राज्य सरकारच्या इस्पितळात घडली असल्याने नवजात अर्भकांच्या जीविताचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारचीच आहे. सरकार ती झटकू शकत नाही, असे मानवाधिकार आयोगाने राज्याला ठणकावले आहे. फायर ऑडिटच्याच मुद्दयावर बातमीदारांच्या नेटवर्कद्वारे गेले तीन दिवस राज्याच्या कानाकोपऱ्यातील वस्तुस्थिती तपासून पाहात आहे. 

पोलिसांकडून आकस्मिक  मृत्यू नोंदवून तपास या अग्निकांड प्रकरणात भंडारा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले. सहायक जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुनीता बढे यांच्या वतीने परिसेविका ज्योती शेखर भारसाकरे यांनी ही तक्रार दाखल केली. त्यावरून शनिवारी सायंकाळी ७.४६ वाजता आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

महाराष्ट्रातील भंडारा इथल्या रुग्णालयातील भीषण आगीत प्राण गमावलेल्या प्रत्येक मुलाच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून दोन लाख रुपये, गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी  पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदान द्यायला पंतप्रधान @narendramodi यांनी मंजुरी दिली आहे.- पंतप्रधान कार्यालय

टॅग्स :Bhandara Fireभंडारा आग