बॉक्स
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने खाजगी डॉक्टरांनी या इंजेक्शनचा उपयोग ई व एफ गटातील रुग्णांसाठी करावा. राज्यस्तरावरील टास्क फोर्स समितीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांवरील उपचारादरम्यान २३ मार्च रोजीच्या पत्रात शिफारस केल्यानुसार सर्व रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे. मात्र रेमडेसिविर इंजेक्शनचा उपयोग फक्त ई व एफ गटातील रुग्णांसाठीच करण्याचे निर्देशित केले आहे.
संदीप कदम, जिल्हाधिकारी
बाॅक्स
काय आहे ‘ई व एफ’ गट
रुग्णाच्या लक्षणांवरून या दोन गटात त्यांचे वर्गीकरण केले आहे. ई गटातील रुग्णांमध्ये श्वसनसंस्था बंद पडणे, श्वास प्रश्वास एक मिनिटात २४ पेक्षा जास्त असणे, एसपीओ २ ची पातळी ९४ पेक्षा कमी असणे, एसपीओ-२ची पातळी ६० पेक्षा कमी असणे, अशा रुग्णांचा समावेश आहे. तर एफ गटातील रुग्णांमध्ये श्वसनसंस्था बंद पडण्यासह अन्य अवयव संस्था निकामी होणे या लक्षणांचा समावेश आहे.
कोट
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शन तत्त्वानुसार कोरोनाच्या उपचारासाठी रेमडेसिविरचा फारसा उपयोग नाही. ज्या रुग्णांची प्राणवायू पातळी ९० च्या खाली आहे त्यांना प्राणवायूची गरज असते, अशा रुग्णांनासुद्धा रेमडेसिविरची आवश्यकता नाही. कोरोना उपचारासाठी रेमडेसिविर गरजेचे आहे, असे अजिबात नाही. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी बाजारात रेमडेसिविरचा तुटवडा असतांना इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.
- डॉ. निखिल डोकरीमारे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, भंडारा
कोट
सध्या बरेच लोक कोविड पॉझिटिव्ह येत आहेत. पॉझिटिव्ह आले की आभाळ कोसळल्यासारखी परिस्थिती होते. मग एका कोविड हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलला बेडकरिता धावपळ चालू होते. सिटी स्कॅनकरिता रांग लागते. सध्या इंजेक्शन रेमडेसिविरचा खूप तुटवडा आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने प्राणवायू सध्या सनफ्लॅग देत आहे म्हणून बरे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या उपचारासाठी रेमडेसिविरची काहीच आवश्यकता नाही. कृपया डब्ल्यूएचओची वेबसाईट बघावी व शहानिशा करून घ्यावी.
-डॉ. नितीन तुरसकर
अध्यक्ष आयएमए, भंडारा