शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गत पाच वर्षांपासून ओबीसी, एनटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 13:57 IST

Bhandara : समाज कल्याण विभागाने लक्ष देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी, एनटी विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे व त्यांना साहाय्य आर्थिक व्हावे, यासाठी पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना राज्य सरकारने सुरू केली. पण, मागील पाच वर्षांपासून ही शिष्यवृत्ती समाज कल्याण विभागाकडून वितरित झालेली नाही. ही शिष्यवृत्ती त्वरित वितरित करावी, अशी मागणी शिक्षक भारती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष उमेश सिंगनजुडे यांनी केली आहे.

शासकीय व खासगी शाळेत इयत्ता १ ते १० मध्ये शिकत असलेल्या ओबीसी आणि एनटी विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. राज्यसरकारने २०१८-१९ ला ही शिष्यवृत्ती योजना ओबीसी व भटक्या विमुक्त जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू केली होती. आता शैक्षणिक सत्र २०२४-२५ ला सुरुवात झाली. पण, अजूनही मागील ५ - वर्षांपासून एकही रुपया विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मिळालेला नाही. या योजनेच्या लाभासाठी दरवर्षी पालक कागदपत्रे बनवतात. परिणामी पालकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. मात्र, मुलांना या योजनेचा फायदा मिळत नाही. योजनेचा लाभ मिळत नसल्याने यंदा अनेक पालकांनी या योजनेसाठी अर्ज करणे बंद केले आहे. समाज कल्याण विभाग आणि राज्यसरकारने ओबीसी समाजाच्या भावना लक्षात घेऊन प्रलंबित असलेली पूर्व मॅट्रिक शिष्यवृत्ती त्वरित वितरित करावी, अशी मागणी उमेश सिंगनजुडे यांनी केली आहे.

निधीची उपलब्धता, मात्र वाटपात दिरंगाईभंडारा जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. समाज कल्याण विभागाकडे कर्मचारी कमतरता असल्याचे कारण पुढे करून निधी उपलब्ध असूनही ओबीसी, एनटी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिली जात नाही. हा ओबीसी विद्यार्थ्यांशी दुजाभाव करण्याचा प्रकार आहे.

पाच वर्षांत १,५०,४७२ विद्यार्थी वंचितभंडारा जिल्ह्यातील १ लाख, २८ हजार ३६७ ओबीसी विद्यार्थी आणि २२ हजार १०५ एनटी विद्यार्थी यांना ही शिष्यवृत्ती मिळाली नाही. याचा अर्थ भंडारा जिल्हा परिषद समाजकल्याण विभाग जाणीवपूर्वक ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरणाकडे दुर्लक्ष करीत आहे, हे दिसून येते. यामुळे ओबीसी, एनटी विद्यार्थी, पालकांत प्रचंड संताप आहे.

लोकप्रतिनिधी लक्ष देणार काय ?राजकारण्यांना निवडणुका आल्या की, ओबीसी, एनटीची आठवण येते. परंतु, ओबीसींचे प्रश्न सोडविण्यासाठी कधीही पुढाकार घेतला जात नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पाच वर्षात १,५०,४७२ विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित असताना गप्प आहेत. 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीStudentविद्यार्थीOBCअन्य मागासवर्गीय जातीbhandara-acभंडारा