शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

बांधकामासाठी रेती मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 06:00 IST

जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. तरीही काही घाटांवर रेती तस्करांची खुलेआम मुजोरी दिसून येत आहे. याचा सर्वाधिक प्रभाव पवनी, तुमसर व मोहाडी तालुक्यात दिसून येत आहे.

ठळक मुद्देभावही वधारले : चोरी छुप्या मार्गाने रेतीची वाहतूक सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकीकडे जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव झाले नाही. परिणामी इमारत बांधकामासह रस्ते व नाली बांधकामासाठी रेती मिळणे अवघड झाले आहे. दुसरीकडे ज्यांनी रेतीचा स्टॉक करून ठेवला आहे त्यांनी रेतीचे भाव वाढवून रेतीची चोरी छुप्या मार्गाने विक्री करीत आहेत.जिल्ह्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीसह तिच्या उपनद्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात येत आहे. मात्र प्रशासनाच्या कारवाईमुळे रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. तरीही काही घाटांवर रेती तस्करांची खुलेआम मुजोरी दिसून येत आहे. याचा सर्वाधिक प्रभाव पवनी, तुमसर व मोहाडी तालुक्यात दिसून येत आहे.खाजगी घर बांधकाम करणाऱ्यांना रेतीचा पुरवठा वेळेवर होत नसल्यामुळे बांधकाम अडचणीत सापडले आहेत. अशीच अवस्था योजनेंतर्गत बांधून देण्यात येणाºया घरकुलांचीही स्थिती आहे. मात्र ज्यांचे अधिकाºयांशी साटेलोटे आहे अशांचे मात्र चांगलेच फावले आहे. दुसरीकडे चोरी छुप्या मार्गाने रेतीची वाहतूक करणाºया पेटी कंत्राटदारांची दमछाक होत आहे.रेतीची अवैध वाहतूक करताना पकडल्यास दंडाची रक्कम अधिक असल्याने ती आपल्याला भरून द्यावी लागणार, या भितीपोटी रेतीची वाहतूक सुरू आहे. १८०० ते दोन हजार रूपयापर्यंत प्रती ट्रॅक्टर उपलब्ध होणारी रेतीचे भाव आजघडीला अडीच ते तीन हजारापर्यंत पोहचले आहे. घर बांधकाम करणाºयांची ही एकप्रकारे सर्रास लुट आहे. यावर मात्र महसूल प्रशासन हतबल दिसून येत आहे. घरमालकही बांधकाम थांबेल या भीतीपोटी महागड्या रेतीची खरेदी करीत आहे. प्रशासनाची कारवाई होत असली तरी काही अधिकाºयांच्या वरदहस्ताने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.पहाटेपासून सुरू होतो गोरखधंदारेतीची अवैध वाहतूक सुरू करण्याचा गोरखधंदा पहाटेपासूनच सुरू होतो. आधीच अवैध वाहतूकसह ओव्हरलोड वाहतुकीने रस्त्यांचे हाल झाले असताना अपघातांचीही संख्या वाढली आहे. गुरूवारी ओव्हरलोड वाहतुकीचा फटका एका ११ वर्षीय बालकाला बसला. अज्ञात ट्रेलरने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भंडारा-वरठी राज्य मार्गावर घडली. याच मार्गावर रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. पहाटेपासूनच ही वाहतूक सुरू होत असून जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही अशीच स्थिती आहे.

टॅग्स :sandवाळू