शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
2
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
3
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
4
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
5
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
6
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
7
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
8
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
9
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
10
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
11
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
12
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
13
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
14
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
15
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
16
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
17
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
18
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
19
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...

ना धानाचे चुकारे ना पैशाची व्यवस्था, दिवाळी साजरी करावी तरी कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2021 4:40 PM

दिवाळी अगदी एक दिवसावर आली तरी शेतकरी आजही धान कापणीसाठी शेतातच राबताना दिसत आहे. कुणाच्याही चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद दिसत नाही.

ठळक मुद्देशेतकरी शेतात : गावखेड्यात दिवाळीचा उत्साहच नाही

भंडारा : कोरोना संसर्गाने ग्रामीण अर्थव्यवस्था मोडकळीस आली असताना निसर्गाचे दुष्टचक्रही शेतकऱ्यांच्या पाठीशी लागले आहे. दिवाळी अगदी एक दिवसावर आली असतानाही गावखेड्यात उत्साहच दिसत नाही. शेतकरी शेतातच राबत असून, पैशाची तजवीज करताना नाकीनव येत आहेत.

भंडारा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. दिवाळीचा सण हा धानपिकावर साजरा केला जातो. परंतु गत काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. गत दीड वर्षात तर कोरोनाने संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. कुणाच्याही हातात पैसे नाही. गावखेड्यातून शहरात रोजगारासाठी गेलेले गावात रिकामे बसून आहेत. अशा स्थितीत दिवाळी साजरी कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. धान विकून पैसे आणावे तर व्यापारी अत्यल्प दरात धान खरेदी करीत आहेत. आधारभूत केंद्रावर धान द्यावा तर वेळेवर पैसे मिळण्याची शक्यता नाही. अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे.

पूर्वी दिवाळी म्हणजे गावात उत्साहाचे-आनंदाचे वातावरण असायचे. पाच दिवस दिवाळी म्हणजे आनंदाची पर्वणी असायची. नवीन वस्तूंसह कपड्यालत्त्यांची खरेदी व्हायची. घरांची रंगरंगोटी केली जायची. परंतु आता हे सर्व चित्र बदलले आहे. दिवाळी अगदी एक दिवसावर आली तरी शेतकरी आजही धान कापणीसाठी शेतातच राबताना दिसत आहे. कुणाच्याही चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद दिसत नाही.

आठवडी बाजारातही गर्दी दिसेना

ग्रामीण भागात खरेदीचे हक्काचे ठिकाण म्हणजे आठवडी बाजार. दिवाळीपूर्वीचा आठवडी बाजार म्हणजे वर्षातील सर्वांत मोठा बाजार. प्रत्येक वस्तू खरेदी करण्याचा या बाजारात ग्रामीण जनतेचा कल असतो, परंतु शेतकरी आणि शेतमजुरांची आर्थिक स्थिती बिकट असल्याने खरेदीकडे पाठ फिरविल्याचे दिसत आहे. गत आठवडाभरापासून जिल्ह्याच्या विविध ठिकाणी असलेल्या आठवडी बाजारात हवी तशी गर्दीच झाली नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीDiwaliदिवाळी 2021