मंजूर असलेली कामे सुरु करण्यास कृषी विभागाची ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST2021-05-21T04:37:01+5:302021-05-21T04:37:01+5:30

अर्जुनी-मोरगाव : कृषी विभागाने ग्रामपंचायतीकडे मजुरांची मागणी केली. ग्रामपंचायतीने जॉबकार्ड असलेल्या मजुरांना नमुना चार दिला. मात्र, दीड महिन्यांपासून कृषी ...

No. of Agriculture Department to start approved works | मंजूर असलेली कामे सुरु करण्यास कृषी विभागाची ना

मंजूर असलेली कामे सुरु करण्यास कृषी विभागाची ना

अर्जुनी-मोरगाव : कृषी विभागाने ग्रामपंचायतीकडे मजुरांची मागणी केली. ग्रामपंचायतीने जॉबकार्ड असलेल्या मजुरांना नमुना चार दिला. मात्र, दीड महिन्यांपासून कृषी विभाग मंजूर असलेल्या भातखाचराचे काम करीत नसल्याचा आरोप दाभना ग्रामवासीयांनी केला आहे.

ग्राम दाभना येथे भातखाचराचे काम मंजूर असून, यासाठी नमुना चारवर असलेले ५० जॉबकार्डधारक मजूर द्यावे, असे पत्र कृषी सहाय्यक मसराम यांनी ग्रामपंचायतीला ३१ मार्च रोजी दिले. ग्रामपंचायतीने रोजगार सेवक मार्फत मजुरांची यादी मसराम यांना दिली. मात्र, दीड महिन्यांचा कालावधी लोटूनही काम सुरू करण्यात आले नाही. सध्या कोरोनाचे संकट सुरू आहे. ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम नाही. उदरनिर्वाहासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात मग्रारोहयोची कामे सुरू होतात. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे गावात कामे नाहीत. उलट याच परिस्थितीत शेजारच्या गावात काम सुरू आहे.

Web Title: No. of Agriculture Department to start approved works