शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
4
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
5
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
6
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
7
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
8
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
9
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
10
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
11
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
12
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
13
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
14
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
15
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
17
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
18
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
19
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
20
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?

निमगावच्या शाळेने घेतली गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 06:00 IST

१९५६ ला एक ते चार वर्ग स्थापन झाल्यानंतर २००१ मध्ये शिक्षकांच्या प्रयत्नांनी इयत्ता पाचवी ते सातवी वर्ग सुरु केले. संस्कार देण्यासह शिक्षण, विज्ञान, क्रीडा व अन्य क्षेत्रात विद्यार्थ्यांची कामगिरी मौलाची ठरली आहे. तसेच परसबाग निर्मिती, विद्यार्थी बचत बँक, विविध वस्तु भांडार, सैनिकी पथसंचलन, विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनात सक्रिय सहभाग आदी उपक्रमात सहभागी आहेत.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम : शिक्षकांचाही सक्रिय सहभाग, शाळा ग्रामीण भागातील

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा असल्यातरी बहुतांश शाळांनी आधुनिक स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी कंबर कसली आहे. असाच प्रयोग लाखनी तालुक्यातील निमगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने राबविला आहे. मुख्याध्यापिका मीरा कहालकर यांच्यासह शिक्षकांच्या प्रयत्नांनी या शाळेने विविध उपक्रम राबवून गगनभरारी घेतली आहे.१९५६ ला एक ते चार वर्ग स्थापन झाल्यानंतर २००१ मध्ये शिक्षकांच्या प्रयत्नांनी इयत्ता पाचवी ते सातवी वर्ग सुरु केले. संस्कार देण्यासह शिक्षण, विज्ञान, क्रीडा व अन्य क्षेत्रात विद्यार्थ्यांची कामगिरी मौलाची ठरली आहे. तसेच परसबाग निर्मिती, विद्यार्थी बचत बँक, विविध वस्तु भांडार, सैनिकी पथसंचलन, विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनात सक्रिय सहभाग आदी उपक्रमात सहभागी आहेत.माती व कवेलूच्या रुपात सुरु झालेल्या या शाळेची आज अवस्था सुस्थितीत आहे. मुख्याध्यापकांसह शिक्षकांच्या पुढाकाराने शाळेला देखणे स्वरुप आले आहे. या शाळेत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमासह राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांमुळे शिक्षण विभागानेही याचे कौतुक केले आहे. यापुर्वी मुख्याध्यापक असलेले डमदेव कहालकर यांनी यासाठी मौलाचे सहकार्य केले आहे.यासाठी सरपंच रुपचंद चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देशमुख, विजय डाभरे, गरपडे, कमाने, अल्का वंजारी आदींचेही विशेष सहकार्य लाभत आहे.निसर्गरम्य परिसरजवळपास दोन दशकांपूर्वी या गावाचा अन्य गावांशी थेट संबंध नव्हता. रस्ताही नसलेल्या या गावात शाळेने गगन भरारी घ्यावी ही उल्लेखनीय बाब ठरली आहे. मुख्याध्यापिका मीरा कहालकर व अन्य शिक्षकांच्या प्रयत्नाने शाळेच्या निसर्गरम्य परिसराला देखणे स्वरुप प्राप्त झाले आहे. लाखनीसह अन्य गावांशी संपर्क आल्याने शाळेच्या जडणघडणीत मोठा वाटा राहिला आहे. विद्यार्थीही या निसर्गरम्य परिसरात रममान होऊन विद्यार्जन करीत आहेत.विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे अपेक्षीत आहे. तरच सक्षम समाज निर्मिती होईल यात दुमत नाही. आजची पिढी स्वावलंबी होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.-मीरा डमदेव कहालकर, मुख्याध्यापकआमच्या गावातील ही शाळा अन्य गावांसमोर एक दिवशी आदर्श ठरेल, असा आमचा विश्वास आहे. मुख्याध्यापक व शिक्षकांचे सहकार्य अत्यंत महत्वाची बाब ठरत आहे.-रुपचंद चौधरी, सरपंच तथा पालकसैनिकी पथसंचलनकार्यक्रमप्रसंगी विद्यार्थी सैनिकी पथसंचलन करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत असतात. याशिवाय कवायत व प्रात्याक्षिकातून सुप्त गुणांचे प्रदर्शनही विद्यार्थी करीत आहेत.

टॅग्स :Schoolशाळा