शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नीलगाईला जीवनदान

By admin | Updated: November 24, 2015 00:37 IST

गावातील मोकाट कुत्री पाठीमागे लागल्याने सैरावैरा पळत सुटलेली नीलगाय गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालवात पडली.

मैत्र संस्थेचा पुढाकार : गोसे धरणातून काढले बाहेरपवनी : गावातील मोकाट कुत्री पाठीमागे लागल्याने सैरावैरा पळत सुटलेली नीलगाय गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालवात पडली. याची माहिती मिळताच मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्देशिय संस्था पवनीचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निलगायीला मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून व पाण्यातुन बाहेर काढून तिला जीवनदान दिले. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालवात साखळी क्र ११/६०० मध्ये निलगाय पडल्याची माहिती मैत्रचे सचिव माधव वैद्य यांना मिळाली. त्यांनी संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांना व वन अधिकाऱ्यांना यांची माहिती देवून संस्थेचे अध्यक्ष खेमराज पचारे, उपाध्यक्ष महादेव शिवरकर, महेश मठीया, संघरत्न धारगांवे, अमोल वाघधरे व वनविभागाच्या चमूसह सर्वजण घटनास्थळी दाखल झाले. निलगायीचा पाठलाग करणाऱ्या मोकाट कुत्र्यांना हुसकावून लावित कालव्यातून सैरावैरा पळत असलेल्या निलगायीला त्यांनी पकडले. तेव्हा निलगाय जखमी असल्याचे त्यांना आढळून आले. निलगायीच्या कानाला कुत्र्यांनी चावा घेतल्याने व नहरातून सैरावेरा पळाल्यामुळे तिचे चारही पायाच्या खुरा रक्तबंबाळ झाल्या होत्या. जखमी अवस्थेतील निलगायीला मैत्रच्या पदाधिकारी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नहराचे बाहेर काढले. यावेळी जखमी अवस्थेतील निलगायीवर घटनास्थळीच मैत्रच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. निलगायीवर प्राथमिक उपचार करुन तिला उपस्थित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुपुर्द केले. यानंतर वनविभागाने निलगायीवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष खेमराज पचारे, उपाध्यक्ष महादेव शिवरकर, सचिव माधव वैद्य, महेश मठीया, संघरत्न धारगांवे, वनविभागाचे बिटरक्षक ए.व्ही.खेनते, आर.बी.घुगे, आर.डी.पांढरे, तसेच वनमजूर आर.एम.कुर्झेकर, आर.के.रामटेके, के.डी.शेंडे, विपीन तलमले, बादल शेंडे, पंकज तलमले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व वनकर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)