शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे धमकावून नवविवाहितेचा हुंड्यासाठी केला छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 11:53 IST

Bhandara : नागपुरातील डेकाटे परिवाराविरोधात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच हुंड्यासाठी सुनेचा व तिच्या माहेरच्यांचा छळ करणाऱ्या नागपूर येथील डेकाटे परिवाराविरोधात भंडारा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात पती अभिषेक उर्फ घृनेश्वर राजेंद्र डेकाटे, सासरे राजेंद्र डेकाटे, सासू माधुरी डेकाटे व नणंद नंदिनी डेकाटे यांचा समावेश आहे.

भंडारा येथील प्रतिक तांबोळी यांची मानसकन्या असलेल्या वैभवीचा विवाह शांतीनगर मुदलियार ले-आऊट नागपूर येथील अभिषेक उर्फ घृनेश्वर डेकाटे याच्यासोबत १९ जानेवारीला झाला होता. मुलगा कमावता असून ७ ते १० लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न असल्याचे लग्नापूर्वी सांगण्यात आले होते. मात्र, अभिषेक कसलाही कामधंदा करीत नसून पूर्णतः आईवाडिलांवर अवलंबून व व्यसनाधीन असल्याचे लग्नानंतर लक्षात आले. फसवणुकीबद्दल वैभवीने सासरच्यांना विचारले असता तीचा छळ सुरू केला. माहेरून रुपये आणायला सांगितले.

एवढेच नाही तर, मुलीचा पती आणि सासऱ्याने प्रतिक तांबोळी यांना प्रत्यक्ष भेटून पाच लाखाची मागणी केली. आमचे नक्षलवाद्यांशी संबंध आहेत. रक्कम न दिल्यास व पोलिसात तक्रार केल्यास मुलीचे बरेवाईट झाले तर तुम्ही जबाबदार राहाल, अशीही धमकी दिली. यानंतर सासू व ननंदेने वैभवीचे सोन्याचे दागिने हिसकावून वडीलांकडून ५ लाख रुपये आण असे सांगून २० मार्चला माहेरी परत पाठवून दिले. 

सासरच्या मंडळींचा तडजोडीस नकार

  • या नंतरही मुलाच्या मामाने तडजोडीसाठी तांबोळी परिवाराला १ एप्रिलला नागपुरात बोलविले.
  • मात्र काहीही न ऐकता सासरच्यांनी अर्वाच्य भाषा वापरत पैसे असेल तर मुलीला ठेवा अन्यथा घेऊन जा, असे बजावले.
  • यानंतर तांबोळी यांनी भंडारा पोलिसामध्ये ३ एप्रिल अर्ज करून भरोसा सेल येथे तडजोडीचा प्रयत्न केला. परंतु वैभवीचे सासरच्या लोकांनी तडजोडीत नकारात्मक भूमिका घेतली. अखेर प्रतिक तांबोळी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असता भान्यासंच्या कलम ८५, ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करून चौकशी सुरू झाली आहे.
टॅग्स :dowryहुंडाnaxaliteनक्षलवादीbhandara-acभंडारा