शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात लग्न समारंभ केवळ 50 पाहुण्यांच्या उपस्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश लागू राहणार आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी लगतच्या नागपूर जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊ लागला आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरिएंटचे संकट घोंगावत आहे. गर्दी टाळण्यासाठी आता नवीन वर्षात लग्न समारंभ केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीतच पार पाडावे लागणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम नवर्षाच्या पूर्वसंध्येला आदेश निर्गमित केला.कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन नवीन व्हेरिएंटचा प्रसार अलीकडे अत्यंत वेगाने होत आहे. राज्यातही बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भंडारा जिल्ह्यात अद्यापपर्यंत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळला नसून कोरोना रुग्णसंख्याही अत्यल्प आहे. मात्र, आगामी काळात काही दिवसांत लग्नसराई व इतर कार्यक्रमात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची भीती आहे. हीच बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने अधिक निर्बंध लागू केले आहेत. २५ डिसेंबर रोजी निर्गमित आदेशात बदल करून आता नव्याने निर्देश जारी करण्यात आले आहेत.विवाह समारंभ बंदिस्त असो की मोकळ्या जागेत कार्यक्रमात केवळ ५० पाहुण्यांच्या उपस्थितीलाच परवानगी राहणार आहे, तसेच सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमातही ५० व्यक्तींच्या मर्यादेतच परवानगी देण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश लागू राहणार आहेत. त्यात सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल, जीम, ब्युटी पार्लर, चित्रपटगृहे, नाट्यगृहामध्ये क्षमतेच्या ५० टक्के नागरिकांची उपस्थिती निर्धारित करण्यात आली आहे. क्रीडा स्पर्धांसाठी प्रेक्षक क्षमतेच्या २५ टक्के नागरिकांनाच उपस्थित राहता येणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून, सदर आदेश ३१ डिसेंबरपासून अमलात आला           आहे.

अंत्यसंस्काराला २० आप्तस्वकीयांना परवानगी- अंत्यसंस्काराला आता २० व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत असेच निर्बंध अंत्यसंस्कारासाठी घालण्यात आले होते. आता पुन्हा नवीन वर्षात २० आप्तांच्या उपस्थितीचे बंधन राहणार आहे. यासोबतच इतर कार्यक्रमांवरही निर्बंध आणण्यात आले आहे. नागरिकांनी ओमायक्रॉन व्हेरिएन्टचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्न