शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

पारंपरिक लग्नपद्धतीत नवीन प्रथा होताहेत रूढ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2024 13:57 IST

अनेक प्रथांचे इव्हेंट झाल्याने पैशाची उधळपट्टी: अनावश्यक व खर्च टाळण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्ककिटाडी : आजकाल विवाह सोहळ्यामध्ये नवनवीन विधी उद्यास आल्या आहेत. त्यात नव्याने रूढ झालेली मेहंदी व हजारो रुपये खर्च हळदी समारंभात करून विशेष सजावट केली जाते. त्या दिवशी हिरवे- पिवळे कपडे (ड्रेसकोड) घालतात. पूर्वी मेहंदी व हळदी विधीची प्रथा ग्रामीण भागात कुठेही दिसून येत नव्हती. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांपासून ग्रामीण भागात ही प्रथा झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे.

पूर्वी मेहंदी व हळदी विधीच्या मागे कोणताही दिखावा नव्हता. उलट त्यामागे धार्मिक व शास्त्रीय तर्क होते. पूर्वी ग्रामीण भागात आजच्यासारखे साबण, शाम्पू, आणि इतर साधनेही नव्हती. ब्यूटी पार्लरही नव्हते. त्यामुळे वधू-वरांच्या चेहऱ्यावर उजळपणा येण्यासाठी आणि चेहरा मुलायम व चमकदार करण्यासाठी हळद, चंदन, मैदा आणि दुधापासून तयार केलेल्या मिश्रणाचा वापर करून चेहरा व शरीर रगडून काढले जात होते. जेणेकरून, वधू-वर सुंदर दिसतील. पूर्वी या कामाची जबाबदारी महिलांची होती; पण आजकाल हळदीचा विधी बदललेला असून दिखाऊ आणि महाग झालेला आहे. समारंभात ड्रेसकोड घातले जातात.

वधू-वर किंवा परिवार फक्त यांचेच ड्रेसकोड नसतात, तर सोबतच मामा, मावशी, आत्या, बहिणी, जावई, मेहुणे, पाहुणे आदी गोतावळा यांचेसुद्धा वेगवेगळ्या फॅशनचे निरनिराळे कपडे असतात. सोबतच नृत्य व गीतांचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. जुन्याकाळी वधू-वर कोणताही गाजावाजा न करता भक्कमपणे आपले जीवन आनंदाने सुरू करीत असत; परंतु आज दृढ हेतू व कृत्रिमता अधिक आहे. कृत्रिमतेत अडकून कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढवीत आहेत.

डीजेशिवाय होतच नाहीम्हटली म्हणजे त्यात बँड, धुमाल व डीजे पाहिजेच. त्याशिवाय वराच्या मित्रांना नाचण्याचा जोशच येत नाही. पैसेवाले सर्वच प्रकारचे वाद्य व वरातीची रोषणाई करून घेतात. हीच प्रथा आता ग्रामीण भागातही दिसून येत आहे. गावात जरी वरात काढली जाणार असली, तरी त्यांनाही डीजे, बँड, धुमाल हवाच. 

अनावश्यक खर्च करायला भाग पाडतातकुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसतानाही वर-वधू पालकांकडे आग्रह धरून त्यांना अनावश्यक खर्च करायला भाग शहरात वरात काढायचीपाडतात. मुला-मुलींच्या इच्छेखातर पालकही आपले मन मारून त्यांची इच्छा पुरवीत आहेत. यासाठी मात्र त्यांना कर्ज काढावे लागले तरी चालेल, अशी स्थिती आहे. सध्याची युवा पिढी या अनाठाई खर्चाला बळी पडत आहे. त्यामुळे पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या अशा नवीन रुजू होणाऱ्या प्रथा थांबविल्या पाहिजेत, अशी अपेक्षा समाजात व्यक्त्त होत आहे.

 

टॅग्स :marriageलग्नMONEYपैसाInflationमहागाईfashionफॅशन