लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विश्व शांती दूत तथागत गौतम बुद्धांनी सबंध विश्वात प्रज्ञा, शील, करुणा, दया, क्षमा, शांती आणि अहिंसेचा पुरस्कार करून विश्वशांतीचे आवाहन केले. तर भारतीय संविधानाचे निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात जागतिक क्रांती केली. या दोन्ही महामानवांच्या विचारांची गरज आज देशाला असल्याचे प्रतिपादन माजी सामाजिक न्याय मंत्री तथा भीमशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत हांडोरे यांनी केले.लाखांदूर तालुक्यातील जैतपूर येथे भीमशक्ती संघटनेच्या जिल्हास्तरीय प्रबोधन विचार कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष यशवंत मेश्राम होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश उपाध्यक्ष एन.पी. पिंपळे, राजेंद्र देशभ्रतार, बाबा बन्सोड, अनिल दहिवले, राजेश नंदागवळी, पुनवटकर, दलितमित्र बाळकृष्ण शेंडे, वामन कांबळे, हर्षवर्धन हुमणे, अंबादास नागदेवे, प्रकाश देशपांडे, विलास मेश्राम, हरिदास बोरकर, दामोधर सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमात पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूरवीरांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना अॅड. यशवंत मेश्राम म्हणाले, भीम शक्ती संघटनेच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी संघटीत होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक विचारांचा प्रसार करावा असे आवाहन केले. यावेळी बाळकृष्ण शेंडे यांनी तयार केलेल्या डॉ.आंबेडकरांच्या जीवनावरील प्रदर्शनाचे निरीक्षण पाहुण्यांनी केले. यशस्वीतेसाठी हर्षवर्धन हुमणे, महेंद्र मेश्राम, भगवान दामले, माधव बोरकर, रवींद्र गणवीर, जयेंद्र सुखदेवे, बादशाह मेश्राम, अरुण ठवरे, हरिदास बोरकर, काशिनाथ हुमणे, रतन मेश्राम, शांताराम खोब्रागडे, फाल्गुन वंजारी, नरेंद्र कांबळे, खुशाल फुल्लूके, मच्छिंद्र टेंभुर्णे, रवी शिंगाडे, रत्नदीप रंगारी, सुनील बांबोर्डे यांनी सहकार्य केले.
बुद्ध व आंबेडकरांच्या विचारांची जगाला गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 01:10 IST