शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

योजनांचा लाभ पोहोचविण्याासाठी पुढाकाराची गरज

By admin | Updated: October 6, 2015 00:49 IST

फक्त घोषणा करून विकास होत नाही तर विकास साध्य करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे.

बाळा काशीवार यांचे प्रतिपादन : पिटेझरी येथे समाधान शिबिरसाकोली : फक्त घोषणा करून विकास होत नाही तर विकास साध्य करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक लोकप्रतिनिधी व जागृत नागरिकांची आहे. असे प्रतिपादन आ.बाळा काशीवार यांनी केले.राजस्व विभागाच्या वतीने आयोजित महाराजस्व सुवर्णजयंती राजस्व अभियान अंतर्गत विस्तारीत स्वरुपातील समाधान योजना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत रोगनिदान शिबिराचे अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हाधिकारी धीरजकुमार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.चाचेरकर, उपविभागीय अधिकारी डी.पी. तलमले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.एच. आळे, उपसभापती लखन बर्वे, जि.प. सदस्य रेखा वासनिक, मंदा गणवीर, नेपाल रंगारी, अशोक कापगते, सरपंच कविता भलावी, पं.स. सदस्य छाया पटले, उषा डोंगरवार, चेतना सोनवाने, धनवंता राऊत, जयश्री पर्वते, उपविभागीय कृषी अधिकारी सांगळे, डॉ.संजय गडकुल, डॉ.उषा डोंगरवार, खंडविकास अधिकारी डॉ.शबाना मोकाशी, डॉ.सुखदेवे उपस्थित होते.आ. बाळा काशीवार म्हणाले, नकारात्मक विचारामुळे आपण आपले कर्तव्य विसरतो. भावी पिढीला सक्षम करण्यासाठी शासनाने विविध योजना अमलात आणल्या आहेत. या समाधान शिबिराचा उद्देश खऱ्या अर्थाने विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचविणे असा असून नागरिकांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आ.काशीवार यांनी केले. तर यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले की, नागरिकांनी आपल्या इच्छाशक्तीचा वापर करून बीपीएल यादीतून आपले नाव वगळण्यासाठी प्रयत्न करून आर्थिकरित्या सक्षम व्हावे. शासनाने नागरिकांच्या विकासाचे सर्व अधिकारी ग्रामसभेच्या माध्यमाने नागरिकांना दिले आहेत. त्या दृष्टीने गावकऱ्यांची सर्वसम्मतीने निर्णय घेऊन शासनाच्या योजना गावात राबविण्याचे आवाहन धीरजकुमार यांनी केले. डॉ.चाचेरकर यांनी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना विषयी मार्गदर्श नकेले. यावेळी शिबिरात नागरिकांना विविध प्रमाणपत्र, शिधा पत्रिका, वितरीत करण्यात आल्या. आरोग्य योजनेअंतर्गत पाचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिरात नागरिकांच्या मार्गदर्शनासाठी विविध विभागाचे प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे संचालन तहसीलदार शोभाराम मोटघरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मंडळ अधिकारी राजेंद्र निंबार्ते यांनी तर आभार प्रदर्शन तलाठी शेखर ठाकरे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)