भंडारा : मकरसंक्रांतीनिमित्त आबालवृध्द थंडीत मौजमजा करतात. यातून नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. एका सणापुरते गोडवा निर्माण न करता संवादातून दररोज गोडवा निर्माण करण्याची गरज आहे, असे भंडाराच्या खंड विकास अधिकारी नुतन सावंत यांनी सांगितले.मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘लोकमत’तर्फे ‘गुड’ बोला, गोड बोला अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत बोलताना नुतन सावंत म्हणाल्या, नियमानुसार काम होत नसेल तर स्पष्ट सांगणे गरजचे आहे. परंतु त्यामुळे समोरची व्यक्ती नाराज होत असेल तर तिच्या चांगल्यासाठीच आपण ते सांगत आहोत. अशी भूमिका मांडल्यास समारेच्याचाही गैरसमज होणार नाही.पंचायत समिती संदर्भात अनेकजण कामे घेऊन येतात. काही लोकांच्या तक्रारीही असतात. येणाऱ्या व्यक्तीशी नुसते गोड बोलून त्यांचे समाधान होणार नाही, समस्याही सुटणार नाही. त्याची नेमकी समस्या जाणून ती सोडविणे महत्त्वाचे आहे. समोरच्या व्यक्तीची समस्या सोडण्यात कायदेशीर अडचणी असल्यास आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचा सल्ला त्याला देणे महत्त्वाचे वाटते. संबंधित व्यक्तीची समस्या मार्गी लागण्यासाठी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांच्या सहकार्याची गरज असते. यासाठी समन्वय महत्त्वाचा असतो. सोबतच लोकप्रतिनिधी व नागरिकांशी सुसंवाद तितकाच महत्त्वाचा आहे. यातून अनेक प्रश्न मार्गी लागण्याला मदत होते. यश प्राप्तीसाठी कुणाचे वाईट न बघता आपल्या कामावर 'फोकस' करावे. मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित हळदीकुंकू निमित्ताने महिलांमध्ये भेटीदरम्यान गप्पा मारल्या जातात. यातून संवाद साधला जातो.चुका नकळत होत असतात. मात्र लवकरच ते विसरूनही जातात. किरकोळ कारणावरून वाद निर्माण होतात. प्रत्येकाने आपला दृष्टीकोण सकारात्मक ठेवला तर मनुष्य आयुष्यात निश्चितच यशस्वी होतो. त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
नात्यातील गोडव्यासाठी संवाद असणे आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 21:56 IST
मकरसंक्रांतीनिमित्त आबालवृध्द थंडीत मौजमजा करतात. यातून नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. एका सणापुरते गोडवा निर्माण न करता संवादातून दररोज गोडवा निर्माण करण्याची गरज आहे, असे भंडाराच्या खंड विकास अधिकारी नुतन सावंत यांनी सांगितले.
नात्यातील गोडव्यासाठी संवाद असणे आवश्यक
ठळक मुद्देबीडीओ नूतन सावंत म्हणतात...