शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:49 PM

बहूजन प्रबोधन मंचच्या वतीने राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन लाखांदूर येथे २६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. उद्घाटन लखनौ विद्यापिठाचे डॉ. डी.एन.एन. एस. यादव यांच्या हस्ते होईल. तर संमेलनाध्यक्षपदी घटनातज्ज्ञ अ‍ॅड. दिलीप काकडे राहतील.

ठळक मुद्देलाखांदूर येथे प्रजासत्ताकदिनी आयोजन : विविध विषयांवर होणार मंथन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बहूजन प्रबोधन मंचच्या वतीने राष्ट्रीय संविधान साहित्य संमेलनाचे आयोजन लाखांदूर येथे २६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. उद्घाटन लखनौ विद्यापिठाचे डॉ. डी.एन.एन. एस. यादव यांच्या हस्ते होईल. तर संमेलनाध्यक्षपदी घटनातज्ज्ञ अ‍ॅड. दिलीप काकडे राहतील.लाखांदूर येथील आर्शिवाद मंगल कार्यालय परिसरात उभारलेल्या महाराजा सयाजीराव गायकवाड साहित्य नगरीत दुपारी १ वाजता उद्घाटन होणार आहे. उद्घाटन सोहळ्याला मार्गदर्शक म्हणून लेखक संजय आवटे, माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक वसंत पुरके, लाखांदूरचे नगराध्यक्ष भाऊराव दिवटे राहतील. यावेळी डॉ. अल्का दहीलकर, मुरलीधर मेश्राम, सोनदास गणवीर, निलकंठ प्रधान, तुकाराम तुमराम यांचा सत्कार करण्यात येईल.द्वितीय सत्रात सायंकाळी ६ वाजता कवी संमेलन होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे राहतील. यात नामदेव कान्हेकर, सी. के. लेंडारे, मुन्ना नंदागवळी, प्रा. अशोक डहाके, प्रा. जी. एस. रामटेके, प्रा. एन. आर. डेकाटे, प्रा. नलिनी चहांदे, निलीमा रंगारी होतील. रात्री ८ वाजता समाजप्रबोधनपर गटार नाटीकेचे आयोजन करण्यात आले आहे.या नाटीकेचे लेखन विरेंद्र गणविर यांनी केले असून बहुजन रंगभूमी नाटीका सादर करणार आहे. यावेळी लाखांदूरचे ठाणेदार निशांत मेश्राम, माजी नगराध्यक्ष निलम हुमणे, स्टेट बँकेचे व्यवस्थापक विलास रिनायत, मेघशाम कुरकुटे, योगेश कुटे उपस्थित राहणार आहे. या स्नेहसंमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन बहूजन प्रबोधन मंचचे अध्यक्ष अनिल कानेकर यांनी केले आहे. प्रजासत्ताक दिनी लाखांदूरकरांना वैचारिक मेजवाणी लाभणार आहे.