लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आयुष्यमान भारत योजनेतून अनेकांची नावे बाद असल्याची माहिती पुढे आली आहे. अधिकाऱ्यांच्या चुकांचा गोर-गरीब जनतेला फटका बसत आहे. त्यामुळे फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे.शासनस्तरावरून सर्वसामान्य, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या आरोग्यासंदर्भात आयुष्यमान भारत योजना लागू करण्यात आली. त्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात आले. परंतु तुमसर तालुक्यातील अनेक गरीब कुटुंबांची नावे या यादीतून बाद झाल्याचे दिसून येत आहे. उलट अनेक श्रीमंतांचा या योजनेत समावेश झाल्याची माहिती आहे. या योजनेतून पाच लाख रूपयांपर्यंत आरोग्य सेवा मोफत मिळते. परंतु अनेकांची नावे नसल्याने या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. अधिकाºयांच्या चुकांमुळे गोर-गरीब जनता या योजनेपासून वंचित असल्याचा आरोप राष्ट्रवादी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष ठाकचंद मुंगुसमारे यांनी केले असून संबंधितांनी याबाबत दखल घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.तुमसर तालुक्यातून अनेकांनी या योजनेसाठी आपली नावे दिली आहेत. परंतु सर्वेक्षणाअंती प्रसिध्द झालेल्या यादीत अनेक नावे दिसत नाही. या योजनेच्या माध्यमातून गोरगरीबांना आरोग्य सुविधा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे.
आयुष्यमान भारतच्या यादीतून गोरगरिबांची नावे झाली गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 22:40 IST
आयुष्यमान भारत योजनेतून अनेकांची नावे बाद असल्याची माहिती पुढे आली आहे. अधिकाऱ्यांच्या चुकांचा गोर-गरीब जनतेला फटका बसत आहे. त्यामुळे फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी जोर धरत आहे.
आयुष्यमान भारतच्या यादीतून गोरगरिबांची नावे झाली गायब
ठळक मुद्देफेरसर्वेक्षणाची मागणी : अधिकाऱ्यांच्या चुकांचा फटका