शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

विवाहाच्या नावावर अल्पवयीन मुलीला पाचवेळा विकले, १५ आरोपींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 21:09 IST

विवाहाच्या नावावर एका अल्पवयीन मुलीची पाचवेळा विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. 

भंडारा : विवाहाच्या नावावर एका अल्पवयीन मुलीची पाचवेळा विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी १५ आरोपींना अटक केली. भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. 

आरोपींमध्ये शिल्पा मेश्राम, कार्तिक मेश्राम रा.केसलवाडा (वाघ), प्रकाश मस्के रा.तेढा, ललीता, विनोद गायधने, विजय सिंघल रा.दिल्ली, समाधान पाटील रा.कंडारी, संजय उर्फ दीपक महाजन रा.एरंडोल, जि. जळगाव, किरण समरीत रा.डोंगरगाव, विनोद उर्फ बाबा मेहर रा.मोहाडी, छोटेलाल पटले, चैनलाल पटले रा. डव्वा, विनोद वैद्य रा.केसलवाडा यांचा समावेश आहे. 

जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या एका अल्पवयीन पीडित मुलीने आईसह नोंदविलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलीची दोन वर्षांपुर्वी शिल्पा नामक महिलेसोबत जिल्हा रूग्णालयात ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत शिल्पाने तिला लाखनी येथे नेले. त्यानंतर १३ सप्टेंबर २०१६ ते २३ सप्टेंबर २०१७ या कालावधीत मुख्य आरोपी शिल्पा आणि अन्य लोकांनी संगनमत करून पैशाच्या हव्यासापोटी तिचे पाच वेगवेगळ्या ठिकाणी पैसे घेऊन लग्न लावून दिले. ज्या लोकांशी तिचा विवाह करून दिला होता त्यांनी तिचे शारीरिक शोषण केले. याशिवाय मुख्य आरोपी शिल्पा आणि कार्तिक मेश्राम या दोघांनी बाहेरील पुरूषांना घरी बोलावून त्यांच्याकडून पैसे घेत  दारू पाजून व नशेच्या गोळ्या देऊन तिचे वारंवार शोषण केले.  

पीड़ितेच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिसांनी भादंवि ३६३, ३६६ (अ), ३७२, ३७६,  (आय), (जे), (के), (एन) व ३४ तथा बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या ४, ८. १२ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्याकडे सोपविला. गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील सर्व १५ आरोपींना विविध ठिकाणाहून अटक केली. 

आतापर्यंत केलेल्या कारवाईत या अल्पवयीन मुलीला जळगाव, राजस्थान राज्यातील जोधपूर आरि बाडमेर आणि नवी दिल्ली सह अनेक ठिकाणी तिला विकण्यात आले होते. यादरम्यान आरोपींकडून केलेल्या शारीरिक शोषणामुळे पीडिता गर्भवती आहे. याप्रकरणात आणखी काही आरोपी असण्याची शक्यता असून त्यांनाही अटक करण्यात येणार आहे.

- सुरेशकुमार घुसर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा भंडारा.

टॅग्स :Crimeगुन्हा