शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रानडुक्कराचा बनाव फसला :बोरी येथील तेजराम राऊत यांचा खुनच, आरोपीस अटक

By युवराज गोमास | Updated: August 26, 2023 19:06 IST

पंधरा दिवसानंतर झाला खूनचा उलगडा

भंडारा : मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बोरी (पांजरा) येथील तेजराम पतिराम राऊत (६०) याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. करडी पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने आरोपीस अटक केली आहे. संजय (पिंटू) गोपाळ राऊत (३७) रा. बोरी, असे आरोपीचे नाव आहे. त्याने आपणच खून केला असल्याचे कबुल केले आहे. या प्रकरणात आणखी आरोपी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलिस अधीक्षक लोहित मतानी यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बागूल यांनी करडी पोलीस स्टेशनमध्ये आरोपीची चौकशी केली. प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला २६ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.मृतक तेजराम राऊत हा ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.१५ वाजता गंभीर गंभीर जखमी अवस्थेत आढळला होता. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले होते.

त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला रानडुक्कराने मारल्याची तक्रार वनविभागाकडे करण्यात आली होती. मात्र, दोनदा वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी चौकशी केली असता रानडुकराचे निशान आढळून आले नाही. पंचनाम्यातही कुणीही घटना पाहिल्याचे नमूद केले नव्हते. दरम्यान करडी पोलिसांनी मर्ग नोंद केला होता.प्रकरणी पोलिस अधीक्षक मतानी लक्ष घालीत स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांना या प्रकरणातील सत्य शोधून आरोपीस अटक करण्याचे निर्देश दिले होते.

टॅग्स :bhandara-acभंडाराCrime Newsगुन्हेगारी