खून करणाऱ्या आरोपीस दोन तासांत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST2021-05-21T04:37:05+5:302021-05-21T04:37:05+5:30

आरोपी संतोष याने सुधीर रमेश सूर्यवंशी (रा. गांधी वॉर्ड, जुना गोंदिया) याला जुन्या भांडणाच्या रागातून काठी व दगडाने मारून ...

Murder accused arrested in two hours | खून करणाऱ्या आरोपीस दोन तासांत अटक

खून करणाऱ्या आरोपीस दोन तासांत अटक

आरोपी संतोष याने सुधीर रमेश सूर्यवंशी (रा. गांधी वॉर्ड, जुना गोंदिया) याला जुन्या भांडणाच्या रागातून काठी व दगडाने मारून त्याचा खून केला. यासंदर्भात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या आरोपीवर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, मोरे, साहाय्यक फौजदार घनश्याम थेर, पोलीस हवालदार सुजित हलमारे, पोलीस नायक सुबोध बिसेन, ओमेश मेश्राम, संतोष बोपचे, प्रमोद चव्हाण, प्रकाश गायधने, श्याम कोरे, संतोष भेंडारकर, छगन विठ्ठले, विकास वेदक यांनी केली आहे.

Web Title: Murder accused arrested in two hours